सांगेली उपसरपंच यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश
⚡सावंतवाडी,ता.२६-: तालुक्यातील सांगेली गावचे भारतीय जनता पक्षाचे (भाजप) विद्यमान उपसरपंच संतोष नार्वेकर यांनी आज आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत (शिंदे गट) जाहीर प्रवेश केला. शिवसेना जिल्हाप्रमुख सच्चिदानंद उर्फ संजू परब यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.
