अरुणभाई दुधवडकर यांची निशांत तोरसकर यांच्या कार्यालयाला भेट…

⚡सावंतवाडी ता.२६-: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवडकर यांनी सावंतवाडी येथील शिवसेना पदाधिकारी निशांत तोरसकर यांच्या संपर्क कार्यालयाला भेट दिली.

या भेटी दरम्यान स्थानिक संघटनात्मक तयारी, निवडणूक नियोजन तसेच पक्षाच्या बळकटी करणाबाबत सविस्तर चर्चा झाली.

यावेळी माजी नगरसेवक उमेश कोरगावकर, उपशहर प्रमुख शेखर सुभेदार, बूथ प्रमुख अन्वर शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या भेटीमुळे स्थानिक शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये नवीन उत्साह निर्माण झाला असून, येणाऱ्या निवडणुकीसाठी पक्ष एकजुटीने काम करण्यास सज्ज असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

You cannot copy content of this page