⚡सावंतवाडी ता.२७-: शिवस्मारक नेमळे येथे दरवर्षीप्रमाणे दीपावलीनिमित्त पुन्हा एकदा उजळला शिवभक्तीचा दीपोत्सव सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या दुर्गसेवकांनी यंदाही नेमळे येथील शिवस्मारक परिसरात दीपोत्सव साजरा करत शिवरायांना शत पणत्यांचा पहिला दिवा अर्पण केला.
पारंपरिक पद्धतीने “जय शिवराय”च्या जयघोषात आणि प्रेरणामंत्र, ध्येयमंत्र, शिवभक्ती गीतांच्या गजरात संपूर्ण परिसर उजळून निघाला.या कार्यक्रमात दुर्गसेवक आणि ग्रामस्थांनी एकत्र येऊन शिवस्वराज्याच्या परंपरेचा जागर केला. दीपोत्सवातून शिवभक्ती, संघटनेची एकजूट आणि हिंदवी स्वराज्याची भावना पुन्हा प्रज्वलित झाल्याचे वातावरण या ठिकाणी अनुभवायला मिळाले.
कार्यक्रमावेळी एकनाथ गुरव, दिनेश सावंत, सुनील राऊळ, सुधीर राऊळ, शुभम नाईक, आनंद राऊळ, सिध्देश धुरी, सावळाराम देवळी, किसन नेमळेकर आदी दुर्गसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते.
