मयूर लाखे:संजू परब यांनी केलेला तो स्टंट, आम्ही सर्वजण रवींद्र चव्हाण आणि विशाल परब यांच्यासोबत..
⚡सावंतवाडी ता.२७-: शहरातील लाखे वस्तीतील बहुसंख्य नागरिक हे विशाल परब यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे सदस्य आहेत केवळ पाच-पन्नास लोकच दीपक भाईंसोबत आहेत त्यामुळे लाखे बांधवांना घेऊन शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी केलेला तो स्टंट होता असे टिका लाखे बांधव तथा सिंधुदुर्ग कोल्हाटी समाजाचे जिल्हाध्यक्ष मयूर लाखे यांनी केली.
ते पुढे बोलताना म्हणाले लाखे बांधवांना पुन्हा घरे बांधून देणार असे सांगून आमदार दीपक केसरकर यांनी आम्हाला फसवले आहे .भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आम्हाला दोन एकर जमीन घरांसाठी देण्याचे जाहीर केले आहे.त्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टी सोबत असून रवींद्र चव्हाण आणि विशाल परब आमचे नेते आहेत. आम्ही बहुसंख्य बांधव त्यांच्यासोबत असून केवळ पाच-पन्नास लोक दीपक भाईंसोबत आहेत त्यामुळे संजू परब यांनी त्यादिवशी केलेला तो स्टंट होता असे टीका लाखे बांधव तथा कोल्हाटी संघटनेचा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष मयूर लाखे यांनी केली.
भारतीय जनता पार्टीमध्ये लाखे बांधवांनी प्रवेश केल्यानंतर काही तासातच लाखे बांधव आणि आम्ही दीपक भाई सोबतच मरेपर्यंत राहणार असे सांगून आम्हाला फसवून भाजप प्रवेश दाखवला असे सांगितले होते तसेच या प्रवेशावर संजू परब यांनीही पत्रकार परिषद घेत जोरदार टीका केली होती. याबाबत आज पुन्हा एकदा लाखे बांधवांनी एकत्र येत आपली भूमिका मांडली,
यावेळी मयूर लाखे म्हणाले, सावंतवाडी सर्वच लाखे बांधव दीपक भाईंसोबत नाही आहेत. काही पाच-पन्नास लोकच दीपक भाईन सोबत आहेत उर्वरित लाकेबांधव हे भारतीय जनता पार्टीचे सदस्य आहेत आम्ही रवींद्र चव्हाण आणि विशाल परब यांच्यासोबत काम करत आहोत भविष्यातही आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार कारण आज लाखे बांधवांना शहरात राहण्याची मुश्किल झाली आहे. दहा बाय दहाच्या घरात किती लोक राहणार हा प्रश्न असून दीपक केसरकर यांनी आम्हाला घरे बांधून देतो असे सांगून फसवले आहेत. मात्र रवींद्र चव्हाण यांनी आम्हाला दोन एकर जमीन घरांसाठी देण्याचे जाहीर केले आहे त्यांनी ओसरगाव मध्ये आम्हाला जमिनीही देऊ केली होती परंतु त्या ठिकाणी जाणे खूपच लांब असल्याने आम्ही दुसरीकडे जमीन देण्यात ची विनंती त्यांच्याकडे केली आहे.
त्यादिवशी झालेल्या भाजप प्रवेशानंतर संजू परब यांनी पत्रकार परिषद घेऊन स्टंटबाजी केली काही लाखे बांधवांना त्यांनी बोलायला भाग पडले परंतु अर्धे अधिक लाखे बांधव हे भाजपसोबत असून केवळ पाच-पन्नास लोकच ही दीपक केसरकर यांच्यासोबत आहेत काही झाले तरी आम्ही रवींद्र चव्हाण आणि विशाल परब यांच्यासोबत शेवटपर्यंत ठाम राहणार आहोत,असं स्पष्ट त्यांनी यावे केले
