Headlines

Global Maharashtra Breaking News

सावंतवाडी सहकारी पतसंस्थेच्या व्हॉइस चेअरमनपदी उमाकांत वारंग यांची बिनविरोध निवड…

संजू परब यांच्याकडून देखील अभिनंदन: विविध क्षेत्रातून देखील मान्यवरांकडून होत आहे शुभेच्छांचा वर्षाव.. सावंतवाडी ता. ३०-:सावंतवाडी सहकारी पतसंस्थेच्या व्हॉइस चेअरमनपदी उमाकांत वारंग यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. उमाकांत वारंग यांच्या निवडीची माहिती मिळताच सावंतवाडी येथील शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तसेच नगरसेवक संजू परब यांनी…

Read Full News

सातोसे बस फेरी सातार्डा पर्यंत करून शालेय विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांची गैरसोयी दूर करा…

उदय पारिपत्ते यांनी उभाठा शिवसेनेच्या वतीने केली मागणी: आगारप्रमुख यांना निवेदन केले सादर.. ⚡सावंतवाडी ता.३०-: येथील सावंतवाडी बस स्थानकातून सुटणारी सावंतवाडी सातोसे ही बस फेरी सातार्डा पर्यंत करुन शालेय विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांची होणारी गैरसोयी दूर करा अशी मागणी आज उबाठा शिवसेनेच्या वतीने सातार्डा माजी सरपंच उदय पारिपत्ते यांच्या वतीने आगारप्रमुख निलेश गावित यांच्याजवळ करण्यात आली. लवकरच…

Read Full News

पगारदार पतसंस्थांच्या समस्या सोडवा…

राज्य सहकारी फेडरेशनकडे निवेदन सादर:प्राथमिक शिक्षक पतपेढी अध्यक्ष चंद्रसेन पाताडे यांची मागणी.. ⚡सिंधुदुर्ग दि.३०-: राज्यभरातील पगारदार पतसंस्थांना काही समस्या भेडसावत असून यावर राज्य सहकारी फेडरेशनने सरकारशी चर्चा करून मार्ग काढावा अशी आग्रही मागणी सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीचे अध्यक्ष चंद्रसेन पाताडे यांनी राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ काकासाहेब कोयटे यांची कोपरगाव (अहिल्यानगर)…

Read Full News

भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये स्काऊट्स-गाईड शिबिर संपन्न…

विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व, सहकार्य व सेवाभावनेचा विकास.. ⚡सावंतवाडी ता.३०-: यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी कब-बुलबुल व स्काऊट्स गाईड शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. शिबिराची सुरुवात प्रार्थना गीत व ध्वज फडकावून करण्यात आली. यावेळी शाळेचे संस्थापक अच्युत सावंत भोसले, अध्यक्षा अस्मिता सावंत भोसले, सचिव संजीव देसाई, सीईओ ले.कर्नल रत्नेश सिन्हा, प्राचार्या प्रियंका देसाई उपस्थित…

Read Full News

कुडाळात रोटरी फेस्टिव्हलचे शानदार उदघाटन…

⚡कुडाळ ता.३०-: सरत्या वर्षांला निरोप आणि  नवीन वर्ष स्वागत करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ कुडाळच्या रोटरी महोत्सवाचे उद्घाटन कुडाळ हायस्कूल मैदानावर जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखात झाले    रोटरी क्लब ऑफ कुडाळ आयोजित रोटरी महोत्सव 2025 चे आयोजन आजपासून.29,30 व 31 डिसेंबर रोजी कुडाळ हायस्कूल मैदानवर  करण्यात आले आहे. या महोत्सवात इंडस्ट्रियल, फूड…

Read Full News

मुक्ताई ॲकेडमीच्या साक्षी रामदुरकरने राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले…

⚡सावंतवाडी ता.३०-: मुक्ताई ॲकेडमीच्या चौदा वर्षीय साक्षी रामदुरकर हीने शालेय राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावले. क्रिडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य आणि रत्नागिरी जिल्हा क्रिडाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त आयोजनाखाली रत्नागिरीतील डेरवण येथील श्री.विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्टच्या क्रिडा संकुल येथे शालेय राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत मुलींच्या सतरा वर्षे वयोगटात साक्षी उपविजेती…

Read Full News

कुडाळात अनियंत्रित कारचा मध्यरात्री थरार…

एका कार सह दुकानांना धडक:सहाजण पोलिसांच्या ताब्यात.. कुडाळ : कुडाळ शहरात मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास अनियंत्रित भरधाव बलेनो कारने रस्त्यालगतच्या दुकानांना जोरदार धडक देत, उभ्या असलेल्या एका कारलाही धडक दिली. ही घटना शहरातील गीता हाॅटेल समोरील मुख्य रस्त्यावर घडली. या घटनेत दोन्ही गाड्यांचे तसेच एका दुकानाचे नुकसान झाले आहे. कुडाळ जवळ एका ट्रान्सपोर्ट कंपनीची गाडी लुटण्याचा…

Read Full News

भेडशी येथे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात…

⚡दोडामार्ग ता.२९-:धी. बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कला-वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय, भेडशी तसेच इंग्लिश मिडियम स्कूल, भेडशी यांचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत व उत्साहपूर्ण वातावरणात नुकताच संपन्न झाला.कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी प्रशासकीय अधिकारी व सिडको नवी मुंबईचे माजी सल्लागार मोहन गवस यांच्या हस्ते सरस्वती देवीच्या मूर्तीला पुष्पहार…

Read Full News

माटणे वरचीवाडी येथे विहिरीत पडून गवारेड्याचा अंत…

⚡दोडामार्ग ता. २९-: दोडामार्ग तालुक्यातील माटणे वरचीवाडी येथे जंगलातून शेतात शिरलेला एक भला मोठा गवारेडा शेतातील विहिरीत पडून मृत्युमुखी पडल्याची घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. विहिरीला कठडा नसल्याने हा अपघात घडल्याचे स्पष्ट झाले आहे.माटणे येथील सखाराम हरिश्चंद्र गवस हे आपल्या काजू बागेत साफसफाईचे काम करत असताना विहिरीतून दुर्गंधी येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी पाहणी…

Read Full News

राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत चराठेच्या हेमांगी मेस्त्रीला सुवर्णपदक…

मध्यप्रदेशमध्ये उत्कृष्ट कामगिरी; शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्याकडून अभिनंदन… ⚡ सावंतवाडी ता.२८:सावंतवाडी तालुक्यातील चराठे येथील हेमांगी गजानन मेस्त्री हिने मध्यप्रदेश येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले आहे. तिच्या या यशाबद्दल शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संजू परब यांनी तिचे अभिनंदन केले असून, पुढे दिल्ली येथे होणाऱ्या आगामी राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिला मनःपूर्वक…

Read Full News

You cannot copy content of this page