माटणे वरचीवाडी येथे विहिरीत पडून गवारेड्याचा अंत…

⚡दोडामार्ग ता. २९-: दोडामार्ग तालुक्यातील माटणे वरचीवाडी येथे जंगलातून शेतात शिरलेला एक भला मोठा गवारेडा शेतातील विहिरीत पडून मृत्युमुखी पडल्याची घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. विहिरीला कठडा नसल्याने हा अपघात घडल्याचे स्पष्ट झाले आहे.
माटणे येथील सखाराम हरिश्चंद्र गवस हे आपल्या काजू बागेत साफसफाईचे काम करत असताना विहिरीतून दुर्गंधी येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी पाहणी केली असता विहिरीत गवारेड्याचा मृतदेह तरंगताना दिसून आला. याबाबत त्यांनी तातडीने गावच्या पोलीस पाटलांना माहिती दिली. त्यानंतर दोडामार्ग वनविभागाशी संपर्क साधण्यात आला.
वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली. हा गवारेडा अंदाजे तीन ते चार दिवसांपूर्वी विहिरीत पडला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. मृतदेह बराच काळ पाण्यात राहिल्याने कुजण्यास सुरुवात झाली होती. विहिरीत पाणी असल्याने मृतदेह बाहेर काढताना अडचणी आल्या. अखेर वनविभाग, ग्रामस्थ व पोलीस पाटलांच्या सहकार्याने मृत गवारेड्याला बाहेर काढण्यात आले.

You cannot copy content of this page