भेडशी येथे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात…

⚡दोडामार्ग ता.२९-:
धी. बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कला-वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय, भेडशी तसेच इंग्लिश मिडियम स्कूल, भेडशी यांचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत व उत्साहपूर्ण वातावरणात नुकताच संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी प्रशासकीय अधिकारी व सिडको नवी मुंबईचे माजी सल्लागार मोहन गवस यांच्या हस्ते सरस्वती देवीच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून छाया स. धणें (सरपंच, ग्रामपंचायत साटेली-भेडशी), न्यू इंग्लिश स्कूल व कला-वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय, भेडशीचे प्राचार्य व समन्वय समितीचे सहसचिव नंदकुमार नाईक, मोहन पांगम (ज्येष्ठ माजी शिक्षक, रा.वि. कुडासे), वृषाली करमळकर (ज्येष्ठ माजी शिक्षिका, न्यू इंग्लिश स्कूल भेडशी), सीमा देऊलनकर (ज्येष्ठ मुख्य शिक्षिका, शा.मा.वि. पिकुळे), निवृत्ती कांबळे (ज्येष्ठ मुख्य शिक्षक, शा.मा.वि. पिकुळे), संजय उसपकर (उद्योजक, परमे), फातर्पेकर, माजी विस्तार अधिकारी दीपा दळवी, देविदास कोरगावकर, सुभाष बोन्द्रे, पंढरीनाथ देऊलकर, भाऊ टोपले, अनिल मोरजकर, प्रमोद खानोलकर, मंदार फातर्पेकर, बाबी देसाई, माजी सैनिक मधुकर लोंढे, मंडळ अधिकारी कांचन गवस, राजश्री पाटील, पांगम, एस. एन. देसाई, कर्पे, शंकर राठोड, एच. आर. सावंत, भिसे, देऊलकर, भोगले, तसेच दोडामार्ग पत्रकार समितीचे अध्यक्ष रत्नदीप गवस, शंकर जाधव, तेजस गवस आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शाळेच्या वतीने मोहन गवस, छाया धणें, मोहन पांगम, वृषाली करमळकर, फातर्पेकर, सीमा देऊलकर, दीपा दळवी, देविदास कोरगावकर, एन. पी. कांबळे, संजय उसपकर, समन्वय समितीचे सदस्य सुभाष बोन्द्रे, एस. एन. देसाई, प्रमोद खानोलकर, रत्नदीप गवस, तेजस देसाई, शंकर जाधव, कांचन गवस व मधुकर लोंढे यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नंदकुमार नाईक यांनी केले. शैक्षणिक व सांस्कृतिक अहवाल शंकर राठोड यांनी सादर केला, तर क्रीडा अहवाल एच. आर. सावंत यांनी मांडला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

You cannot copy content of this page