सावंतवाडी सहकारी पतसंस्थेच्या व्हॉइस चेअरमनपदी उमाकांत वारंग यांची बिनविरोध निवड…

संजू परब यांच्याकडून देखील अभिनंदन: विविध क्षेत्रातून देखील मान्यवरांकडून होत आहे शुभेच्छांचा वर्षाव..

सावंतवाडी ता. ३०-:
सावंतवाडी सहकारी पतसंस्थेच्या व्हॉइस चेअरमनपदी उमाकांत वारंग यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.

उमाकांत वारंग यांच्या निवडीची माहिती मिळताच सावंतवाडी येथील शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तसेच नगरसेवक संजू परब यांनी पुष्पगुच्छ देत त्यांचे अभिनंदन केले. वारंग यांच्या अनुभवाचा आणि कार्यशैलीचा पतसंस्थेच्या प्रगतीस निश्चितच लाभ होईल, असा विश्वास
यावेळी व्यक्त करण्यात आला.
त्यांच्या निवडीबद्दल विविध क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

You cannot copy content of this page