Headlines

Global Maharashtra Breaking News

सावंतवाडी येथे रथसप्तमीनिमित्त १०८ सूर्यनमस्कार संकल्प योगशिबीर उत्साहात संपन्न…

⚡सावंतवाडी ता.२५-: रथसप्तमी अर्थात जागतिक सूर्यनमस्कार दिनाचे औचित्य साधून फिटनेस योग अकॅडमी सिंधुदुर्ग व घे भरारी फाउंडेशन, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी येथे आज (दि. २५ जानेवारी २०२६) १०८ सूर्यनमस्कार संकल्प योगशिबीर मोठ्या उत्साहात पार पडले. मन, शरीर आणि आत्मा यांचा संगम म्हणजे योग हा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात…

Read Full News

भंडारी एज्युकेशन सोसायटी कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या निधीतून स्मार्ट बोर्डचे लोकार्पण…

मालवण दि प्रतिनिधी मालवण येथील भंडारी एज्युकेशन सोसायटी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सन २०२३-२४, २००२४-२५ व २०२५- २६ या बॅचच्या विद्यार्थ्यांच्या शुभेच्छा प्रदान (निरोप समारंभ) कार्यक्रमातून जमा झालेल्या निधीतून खरेदी करण्यात आलेले स्मार्ट बोर्ड इयत्ता बारावी कला- वाणिज्य व इयत्ता अकरावी कला-वाणिज्य या दोन वर्गांमध्ये लावण्यात आले. इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते हे दोन्ही स्मार्ट बोर्ड संस्थेकडे औपचारिकरित्या…

Read Full News

इन्स्पायर सिंधुदुर्ग सायकल रेस आंतरराष्ट्रीय दर्जाची व्हावी…

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे प्रतिपादन:ठाण्याचा श्रीकांत खडतरे महाविजेता,योगेश्वरी कदम, सिध्देश पाटील नवीन नाईक ठरले गट विजेते.. कुडाळ : इन्स्पायर सिंधुदुर्ग सायकल रेस हि आंतरराष्ट्रीय दर्जाची व्हावी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सायकलपटूंसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी व्यक्त केले. सिंधुदुर्ग सायकलिस्ट असोसिएशन, रेन्बो रायडर्स सिंधुदुर्ग आयोजित इन्स्पायर सायकल 8 वे पर्व बॅ नाथ पै शिक्षण…

Read Full News

काळ आला होता मात्र…

वागदे – ओसरगाव च्या हद्दीवर बस व कार चा अपघात:दोघेजण गंभीर जखमी ; पोलीस घटनास्थळी दाखल.. ⚡कणकवली ता.२५-: गोव्याहून पुण्याच्या दिशेने जात असलेल्या कारचे नियंत्रण सुटल्याने कार डिव्हायडर वर चढून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या दुसऱ्या लेनवर येत गोव्याच्या दिशेने जात असलेल्या एसटी बसला आदळली. कारमधील दोन प्रवासी सुरक्षित असून अजून दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ही…

Read Full News

आंबोलीच्या आपदा मित्र प्रथमेश गावडे यांचा राष्ट्रपती भवनात सन्मान…

⚡सावंतवाडी ता.२५-: देशाच्या राजधानीत होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. सिंधुदुर्गच्या आंबोलीतील सुपुत्र आणि ‘आपदा मित्र’ प्रथमेश गावडे यांची प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या विशेष कार्यक्रमासाठी निवड करण्यात आली होती. राष्ट्रपतींच्या उपस्थित त्यांचा सन्मान करण्यात आला. प्रथमेश गावडे यांनी ‘आपदा मित्र’ म्हणून आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात केलेल्या अत्यंत धाडसी आणि उत्कृष्ट कार्याची…

Read Full News

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील समस्यांवर तोडगा; उपोषण स्थगित…

सावंतवाडी:जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या मान्यतेने सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालयात प्रतिनियुक्तीवर एम.डी. फिजियन डॉक्टर, प्रतिनियुक्तीवर रेडिओलाँजिसँट, भुलतज्ञ देण्याचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांनी मान्य केल्याने सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालय कृती समितीने 26 जानेवारीला पुकारलेले उपोषण तूर्त स्थगित केले.सावंतवाडी उप जिल्हा रूग्णालयातील रिक्त वैद्यकीय अधिकारी पदे, प्रशासकीय पदे भरणे, ट्रामा केअर युनिट सक्षमतेने कार्यान्वित करणे, सकिँट बेंचच्या…

Read Full News

पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांना ‘राष्ट्रपती पदक’ जाहीर…

⚡वेंगुर्ला ता.२५-: सन 2002 मध्ये उपअधीक्षक म्हणून महाराष्ट्र पोलीस दलात रुजू झालेले डॉ. मोहन दहिकर यांनी आपल्या दीर्घ, निष्ठावान आणि कर्तृत्ववान सेवेद्वारे पोलीस दलात वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी भारत सरकारकडून त्यांना राष्ट्रपती पदक (Medal for Meritorious Service) जाहीर झाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.सेवेच्या प्रारंभी वरोरा आणि नागपूर…

Read Full News

​हर्षा ठाकूर यांचे आरोप बिनबुडाचे…

पाणी पुरवठा सभापती तन्वी चांदोस्कर यांचे जोरदार प्रत्युत्तर,देवगडच्या पाणी प्रश्नावरून राजकारण तापले.. ⚡​देवगड ता.२५-:कोर्ले-सातंडी आणि दहिबाव नळपाणी योजनेवरून उबाठा गटाच्या हर्षा ठाकूर यांनी केलेले आरोप धादांत खोटे आणि राजकीय आकसापोटी केलेले आहेत. त्यांनी येत्या १५ दिवसांत भ्रष्टाचाराचे पुरावे सादर करावेत, अन्यथा त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला जाईल, असा इशारा देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या पाणी पुरवठा सभापती सौ….

Read Full News

राष्ट्रवादी (शरद पवार) कडून माटणेत रविकिरण गवस मैदानात…

दोडामार्ग :राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे सावंतवाडी विधानसभा उपाध्यक्ष तथा खोक्रल गावचे सुपुत्र रविकिरण गवस यांनी माटणे जिल्हा परिषद मतदारसंघातून उमेदवारी दाखल करत सत्ताधारी व प्रस्थापित व्यवस्थेपुढे थेट आव्हान उभे केले आहे. “विकास हवा तर बदल हवा” या ठाम भूमिकेसह स्थानिक, अभ्यासू आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणारा उमेदवार म्हणून त्यांची उमेदवारी मतदारसंघात विशेष चर्चेचा विषय…

Read Full News

कोंडुरे येथील श्री ब्राह्मण देव मंदिर वर्धापन दिन सोहळा २६ जानेवारीला…

⚡सावंतवाडी ता.२५-: येथील श्री ब्राह्मण देव मंदिर वर्धापन दिन सोहळा (वर्ष तिसरे)सोमवार दि. २६ जानेवारी २०२६ साजरा होणार असून,या दिवशी मंदिरात सकाळी ८:०० वा. धार्मिक विधी,सकाळी १०:०० वा. श्री सत्यनारायण महापूजा व आरतीदुपारी १:०० वा. तीर्थप्रसाद व महाप्रसाद, सायंकाळी ५:०० वा.स्थानिकांची भजने तसेचरात्रौ ९:०० वा.नितीन आसयेकर प्रस्तुतश्री देवी भुमिका दशावतार लोककला नाट्यमंडळ, मळगांवयांचा महान पौराणिक…

Read Full News

You cannot copy content of this page