मालवण दि प्रतिनिधी
मालवण येथील भंडारी एज्युकेशन सोसायटी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सन २०२३-२४, २००२४-२५ व २०२५- २६ या बॅचच्या विद्यार्थ्यांच्या शुभेच्छा प्रदान (निरोप समारंभ) कार्यक्रमातून जमा झालेल्या निधीतून खरेदी करण्यात आलेले स्मार्ट बोर्ड इयत्ता बारावी कला- वाणिज्य व इयत्ता अकरावी कला-वाणिज्य या दोन वर्गांमध्ये लावण्यात आले.
इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते हे दोन्ही स्मार्ट बोर्ड संस्थेकडे औपचारिकरित्या सुपूर्त करण्यात आले. संस्थेचे ऑनररी जनरल सेक्रेटरी श्री. साबाजी करलकर यांच्या हस्ते बारावीच्या वर्गातील स्मार्ट बोर्डचे तर अकाउंटन्सी विषयाचे तज्ञ मार्गदर्शक श्री. लवू परब (मुंबई) यांच्या हस्ते इयत्ता अकरावी कला- वाणिज्य वर्गातील स्मार्ट बोर्डचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी लोकल कमिटी सेक्रेटरी श्री. दशरथ कवटकर, प्राचार्य श्री. तिवले, सर्व प्राध्यापक तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
या स्मार्ट बोर्डमुळे अध्यापन अधिक प्रभावी, आधुनिक आणि विद्यार्थीकेंद्रित होणार असून डिजिटल शिक्षणाला चालना मिळणार आहे. विद्यार्थ्यांनी निरोप समारंभातून जमा झालेल्या निधीचा शैक्षणिक उपयोगासाठी केलेला हा उपक्रम कौतुकास्पद असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
