पाणी पुरवठा सभापती तन्वी चांदोस्कर यांचे जोरदार प्रत्युत्तर,देवगडच्या पाणी प्रश्नावरून राजकारण तापले..
⚡देवगड ता.२५-:
कोर्ले-सातंडी आणि दहिबाव नळपाणी योजनेवरून उबाठा गटाच्या हर्षा ठाकूर यांनी केलेले आरोप धादांत खोटे आणि राजकीय आकसापोटी केलेले आहेत. त्यांनी येत्या १५ दिवसांत भ्रष्टाचाराचे पुरावे सादर करावेत, अन्यथा त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला जाईल, असा इशारा देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या पाणी पुरवठा सभापती सौ. तन्वी योगेश चांदोस्कर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.
दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, श्रीमती हर्षा ठाकूर यांनी माझ्यावर आरोप केला की, कोर्ले – सातंडी प्रस्तावित नळयोजनेची नेमण्यात आलेली PMC टक्केवारीसाठी खासगी संस्थेची नेमणूक केली तर हर्षा ठाकूर जेव्हा नगरसेवक होत्या तेव्हा माझ्या माझे पती श्री.योगेश चांदोस्कर हे या शहराचे उपनगराध्यक्ष होते व पाणी पुरवठा सभापती होते. तेव्हा त्यांनी खासगी संस्थेचा विचार न करता शासनाची मान्यता असलेली 28/08/2017 रोजी नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेमध्ये ठराव क्र.33(02) रोजी ठराव करुन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला (MGP) ची PMC म्हणून नेमणूक केली होती पण गेली सात (7) वर्षे चार (4) महिने PMC काम करत होती पण समाधानकारक काम न झाल्याने 30/12/2024 रोजी ठराव क्र. 57 ने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (MGP) ची PMC रद्द करुन खासगी संस्थेला (PMC) म्हणून नियुक्ती करणे कामी सभेत मान्यता देण्यात आली. या गोष्टीला 1 वर्ष झालं व त्यानंतर सर्व टेंडर प्रक्रिया झाली व नवीन PMC ला वर्क ऑर्डर देण्यात आली. उबाठाचे पाच नगरसेवक यावेळी सभागृहात उपस्थित होते पण त्यांचा विरोध नव्हता याची माहिती हर्षा ठाकूर यांनी घेतली नाही व चुकीच्या सुत्रामार्फत माहिती घेऊन बिनबुडाचे आरोप करत आहे.
ठाकूरचा दुसरा विषय दहिबाव नळपाणी योजनेसाठी मंजूर कामाच्या 9 कोटी 21 लाख रुपयांची नगरपंचायतीचा हिस्सा 10% रक्कम म्हणजे 92 लाख व कोर्ले – सातंडी नवीन योजनेची 10% रक्कम कशी भरणार . मी सौ.तन्वी योगेश चांदोस्क़र पाणी पुरवठा सभापती माझ्या देवगड जामसंडे नागरिकांना आश्वासित करते की, कुठल्याही परिस्थितीत देवगड जामसंडे शहर वासियांवर कुठलाही आर्थिक भुर्दंड ठेवणार नाही. म्हणजे जरी 10 कोटी जरी भरावे लागले तरी आम्ही ते विविध योजनेमध्ये बसवून ती रक्कम आम्ही उभी करु. आणि त्यासाठी आपले सर्वांचे लाडके पालकमंत्री ना.मा.नितेशजी राणे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही सर्व प्रक्रिया पुर्ण होईल. त्यामुळे 10% रक्कमेसाठी देवगड जामसंडे शहरातील नागरिकांना आम्ही त्रास देणार नाही आहोत, व त्याची काळजी उबाठाच्या ठाकूर यांनी करु नये. कारण आम्ही सर्व नगरसेवक शहर वासियांना बांधिल आहोत. देवगड जामसंडे नगरपंचायतीने जमा केलेली 10% रक्कम महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाजवळ जमा आहे. यांची खात्री उबाठाच्या ठाकूर यांनी करावी.
पाडाघर योजनेचे पाणी एक ठरावामुळे बंद झाले आहे. पण उबाठाच्या ठाकूर यांना सांगू इच्छिते की, 12/7/2018 रोजी जेव्हा ठराव झाला त्यावेळी तुम्हीसुध्दा नगरसेविका होता त्यावेळी तुम्ही सभागृहात उपस्थित होत्या व त्यावेळी तुम्ही ठरावाच्या बाजूने होता त्यावेळी त्या ठरावाला कै.ए.वाय.जाधव साहेबांनी अनुमोदन दिले होते. आणि ठाकूराचे ते गटनेते होते. व राहिला विषय त्या ठरावाबाबत 16/5/2018 रोजी कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या कडून मा.मुख्याधिकारी देवगड जामसंडे नगरपंचायत यांना जा.क्र.315/18 . यांनी पत्र आलं या पत्राप्रमाणे जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग आपल्याला 8/- रुपये प्रति 1000 हजार लिटर पाणी पुरवठा करत होती व आजही त्याच रेट प्रमाणे नगरपंचायत पाणी घेत आहे. पण ती योजना चालवत असतांना जिल्हा परिषदला आर्थिक अडचण येत होती त्यामुळे 10/5/2018 रोजी मा.मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या अध्यक्षतेखाली देवगड येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. व त्यावेळी प्रचलित पाणी पट्टीच्या दरापेक्षा तिप्पट म्हणजे 22/- रु.प्रति हजार लिटर दरवाढ करणे आवश्य़क आहे असे पत्र नगरपंचायतीला आले होते. त्याप्रमाणे 12/7/2018 च्या सभेमध्ये श्री.राजेंद्र मेस्त्री उपविभागीय अभियंता MGP यांनी सभागृहात माहिती दिली की, नगरपंचायतीला 63% पाणी मागणीच्या आधारे रु.2 कोटी 12 लाख एवढी भांडवली हिस्सा देण्या संदर्भात सभागृहाला माहिती दिली त्यावेळी पुर्ण सभागृहाने 22/- रु.प्रति हजार लिटर पाणी पट्टी व 2 कोटी 12 लाख भरणा नगरपंचायतीला व देवगड जामसंडे शहरातील नागरिकांची पाणीपट्टी न वाढण्यासाठी सर्वांनी मिळून निर्णय घेतला गेला होता व 12/7/2018 नंतर पुढील सात वर्षे देवगड जामसंडे नगरपंचायतीला पाणीपुरठा चालू होतं आणि आता ते 15जून 2025 रोजी लाईट बिल थकित असल्याने पाडाघर योजनेचे जिल्हा परिषदने पाणी बंद केले आहे.
पण देवगड जामसंडे नागरिकांना मी सांगू इच्छिते की, मी स्व़त: सभापती झाल्यावर जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली व थकित बील भरण्यास नगरपंचायत तयार असून पाणी चालू करावे . त्त्यानंतर देवगड जामसंडे शहराला पाडाघर पाणी चालू झालं होतं पण खराब पाईपलाईन मुळे पाणी वाया जात असल्याने पाईपलाईनचे काम झाल्यानंतर पाडाघर योजनेचे पाणीसुध्दा नगरपंचायतीला चालू होणार आहे. त्यामुळे उबाठाच्या ठाकूर यांनी काळजी करु नये.
मागील 9 वर्षात चार कोटी खर्च केले असा आरोप उबाठाच्या ठाकूर यांचा आहे पण ठाकूर विसरताय त्या 9 वर्षांपैकी 3 वर्षे तुमच्या उबाठाची सत्ता होती. त्यामुळे त्यांच्या जवळ खर्चाचा हिशोब, पहिला घ्यावा व त्यानंतर दुसऱ्यांवर आरोप करावा.
चौदा हजार प्रति लिकेज कमिशन कोणी खाल्लं, तर माझ्या महिती नुसार माझे पती योगेश चांदोस्क़र नगराध्यक्ष असताना 05/03/2019 MJP.DSR नुसार 2018/19 नुसार 10.541.00 दर मंजूर केला होता पण त्यानंतर 14/02/2022 नंतर नगरपंचायतीत उबाठाची सत्ता होती. मग चौदा हजार प्रति लिकेज कमिशन कोणी केली याची माहिती उबाठा नगरसेवक कडून घ्यावी. चौदा हजाराचे कमिशन कोणाच्या घशात गेले यांचा शोध ठाकूर यांनी प्रथम घ्यावा नंतरच आमच्यावर आरोप करावेत.
त्याचप्रमाणे आता जे दोन दिवस आड पाणी येतं त्याच पुर्ण श्रेय देवगड जामसंडे शहरातील नळधारक नागरिकांना जाते कारण त्यांच्यामुळे हे शक्य़ झाले आहे. त्याचप्रमाणे देवगड जामसंडे शहरातील नागरिकांनी मिळून जी समिती स्थापन केली आहे त्याचं सुध्दा मी मार्ग मार्गदर्शन घेणार आहे व त्यांच्या सुचनांच सुध्दा पालन केल जाईल आणि देवगड जामसंडे शहराला नियमित पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी सर्वांची राहील व श्रेय वादात न पडता नवीन कोर्ले – सातंडी नळयोजना मा.पालकमंत्री यांच्या कडून मंजूर करुन घेऊन कायमस्वरुपी प्रश्ऩ मिटवू.
माकडाच्या हातात कोलीत देवून पुन्हा या शहराची राख रांगोळी करु नये यावर आता देवगड जामसंडे शहरातील नागरिकांना चांगल माहित आहे की, उबाठा जवळ सत्ता देऊन गेली 4 वर्षे शहराची राख रांगोळी कोणी केली आहे.
ठाकूर तुमच्या माहितीसाठी सांगते की, तुझ्या उबाठा पक्षाची गेली तीन वर्षे सत्ता होती त्यावेळी प्रशासकीय इमारतीच्या बाजूला कचरा डेपो केला होता व उबाठा वाल्यांनी जी राख रांगोळी केली होती ते माझे पती व शहराचे माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्क़र यांनी स्वत़: पुढाकार घेवून आपली स्व़त:ची जागा विनामोबदला दोन वर्ष आमच्या घराशेजारीच कचरा डेपो साठी जागा आम्ही दिली होती. आणि हे पुर्ण देवगड जामसंडे शहराला माहित आहे. त्यामुळे कोणी राख रांगोळी केली हे सर्वांना माहित आहे.
ठाकूर तुमच्या माहितीसाठी सांगते माझे पती योगेश चांदोस्क़र शहराचे नगराध्यक्ष असताना शहराच्या नागरिकांचा पाण्याचा प्रश्ऩ असल्याने जामसंडे वेळवाडी सडा येथे 6 लाख 67 हजार लीटर क्षमतेची पाण्याची टाकी त्यांच्या काळात बांधली गेली व त्यांनतर नगरपंचायतवर उबाठाची सत्ता आल्यांनतर गेली 4 वर्षे ती पाण्याची टाकी नागरिकांसाठी चालू करु शकलात नाहीत व त्यापासून नागरिकांना वंचित ठेवलात. मग पाण्याच्या बाबत कोणी राख रोगोळी केली?
श्री दिर्बा रामेश्वराच्या आशिर्वादामुळे मी देवगड जामसंडे नगरपंचायतीची पाणीपुरवठा सभापती झाले व माझ्या पतीच्या काळात बांधलेली पाण्याची टाकी आता मी चार वर्षानंतर चालू करुन घेत आहे याचे मला समाधान आहे. आणि देवगड जामसंडे शहरातील नागरिकांना सर्व माहीत आहे, खरी राख रांगोळी कोणी केली ती.
आणि आता तुम्ही जे माझ्यावर कमिशनचे आरोप केले आहेत त्यांचे पुरावे पुढील पंधरा दिवसात देवगड जामसंडेच्या जनतेला दयावेत नाहीतर जाहीर माफी मागावी अन्यथा मी तुमच्यावर अब्रु नुकसानीचा दावा दाखल करणार आहे, असा इशारा दिला आहे.
