वागदे – ओसरगाव च्या हद्दीवर बस व कार चा अपघात:दोघेजण गंभीर जखमी ; पोलीस घटनास्थळी दाखल..
⚡कणकवली ता.२५-: गोव्याहून पुण्याच्या दिशेने जात असलेल्या कारचे नियंत्रण सुटल्याने कार डिव्हायडर वर चढून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या दुसऱ्या लेनवर येत गोव्याच्या दिशेने जात असलेल्या एसटी बसला आदळली. कारमधील दोन प्रवासी सुरक्षित असून अजून दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी सायंकाळी ५:३० वा.च्या सुमारास घडली.
बस चालकाने प्रसंगावधान राखत बस आपली बस डिव्हायडर वर चढवली. बसच्या डाव्या बाजूचे मोठे नुकसान झाले तर कारच्या समोरील व मागील बाजूचे नुकसान झाले आहे. या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळतात जिल्हा वाहतूक शाखेचे कणकवली पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.
