Headlines

Global Maharashtra Breaking News

गोव्यात काम करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदारांसाठी सुट्टी जाहीर…

*पालकमंत्री नितेश राणे यांनी गोवा मुख्यमंत्र्यांसोबत केलेल्या चर्चे ने निर्णय:७ फेब्रुवारीच्या मतदानासाठी गोवा सरकारकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदारांना दिलासा.. ⚡सावंतवाडी ता.०६-:सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्या ७ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद व पंचायत समिती साठी निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे मतदार गोवा येथे विविध खाजगी कंपन्या तसेच आस्थापनांमध्ये नोकरीला आहेत त्यांना निवडणुकीसाठी सुट्टी देण्यात यावी अशी…

Read Full News

आंगणेवाडी जत्रेत महिला बचत गटांच्या मालाचे प्रदर्शन व विक्री…

जिल्हा बँक व नाबार्डचे आयोजन.. ⚡मालवण ता.०६-:आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या यात्रेचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा बँकेशी संलंग्न महिला बचत गटांच्या उत्पादीत मालाचे प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाचे आयोजन आंगणेवाडी येथे जत्रा कालावधीत करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ दि. ८…

Read Full News

नेरूर मध्ये मोबाईल लोकअदालतीला उत्स्फूर्त प्रतिसाद…

१८ पैकी ३ प्रकरणे तडजोडीने निकाली.. ⚡कुडाळ ता.०६-: न्याय तुमच्या दारी, विधी सेवा प्राधिकरणाचे योजने अंतर्गत ग्रामपंचायत नेरुर येथे झालेल्या मोबाईल लोकअदालतीला लोकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. कुडाळ दिवाणी न्यायाधीश जी. एस. कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या लोक अदालतीत १८ पैकी ३ प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली.महाराष्ट राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण…

Read Full News

देवगड तालुक्यात ११ जागांसाठी होणार मतदान ; ५३ हजार १४२ मतदार बजावणार मतदानाचा हक्क…

१० जागा बिनविरोध आल्याने २६ हजार ८९४ मतदार मतदानापासून राहिले वंचित.. ⚡देवगड ता.०६-:देवगड तालुक्यात ७ जि.प.व १४ पं.स. निवडणुक आहे.मात्र त्यात १० उमेदवार बिनविरोध आल्या आहेत.आज ७ रोजी मतदान होत असून देवगड तालुक्यात एकूण ८० हजार ३६ एवढी मतदारांची संख्या आहे. त्यात एकूण १० जागा बिनविरोध आल्या असून यामुळे २६ हजार ८९४ मतदान करण्यापासून वंचित…

Read Full News

कुडाळात मतदान साहित्य घेऊन कर्मचारी मतदान केंद्रावर रवाना…

२३ एसटी बसेस आणि २८ इतर वाहनांचा वापर.. ⚡कुडाळ ता.०६-: तालुक्यातील ९ जि.प. व १८ पंचायत समितीच्या जागासाठी उद्या ७ फेब्रुवारी रोजी मनदान होत असून आज सकाळी सर्व मतदान केंद्रावर मतदान मशीन व साहित्य रवाना करण्यात आले. यावेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुसे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन पाटील, नायब…

Read Full News

जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; जिल्हाधिकाऱ्यांची मतदान केंद्रांवर प्रत्यक्ष पाहणी…

⚡सिंधुदुर्गनगरी ता.०६-: जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या शनिवार, दि. 7 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडणार असून, निवडणूक प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सावंतवाडी येथील मतदान पथके मतदान केंद्रांवर रवाना करण्याबाबत आढावा घेतला. तसेच सखी मतदान केंद्र असलेल्या…

Read Full News

वेंगुर्ला तालुक्यात निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज ; ओंकार ओतारी…

⚡वेंगुर्ला ता.०६-: शनिवारी 7 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जि. प. व पं. स. निवडणुकीसाठीवेंगुर्ला तालुक्यातून अधिकाऱ्यांसह आज शुक्रवारी मतदान यंत्रे मतदान केंद्रावर रवाना झाली. सकाळीनिवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार ओंकार ओतारी यांच्या उपस्थितीत एस. टी. बसेस मतदान केंद्रावर रवाना झाल्या.यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजन गवस व दिनेश पाटकर, अतिरिक्तसहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत किरुळकर, अन्य…

Read Full News

माजगाव पॅलेस हॉटेल बस स्टॉप परिसरात कोसळले झाड…

दिनेश सावंत मदतीसाठी धावले ; रस्ता केला मोकळा.. ⚡सावंतवाडी ता.०६-: माजगाव पॅलेस हॉटेल बस स्टॉप परिसरात जुन्या मुंबई–गोवा महामार्गावर आज दुपारी अचानक झाड कोसळून मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. नागरिक, प्रवासी आणि वाहनचालक अक्षरशः अडकून पडले होते. मात्र अशा संकटाच्या क्षणी फक्त आश्वासन न देता प्रत्यक्ष कृती करणारे नेतृत्व म्हणून जिल्हा परिषदचे उद्धव बाळासाहेब ठाकरे…

Read Full News

वेंगुर्ला येथे कांदळवन संवर्धन, पर्यावरण रक्षण आणि इको सोल्जर्सचा सन्मान…

⚡वेंगुर्ला ता.०५-: बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ला येथे आयोजित नॅशनल कॉन्फरन्स ऑन “Ecological Services for Sustainable and Healthy Future” या परिषदेचा उत्साहात समारोप झाला.परिषदेच्या अंतिम दिवशी विविध पर्यावरणपूरक उपक्रम, प्रात्यक्षिके व सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी मांडवी खाडी येथे कांदळवन सफरीचे आयोजन करण्यात आले. या सफरीत श्रीमती हुले यांच्या स्वामिनी सेल्फ हेल्प ग्रुपच्या…

Read Full News

आडेली पं. स. मतदार संघातील जनतेचे आशीर्वाद माझ्या पाठीशी : समिर कुडाळकर…

⚡वेंगुर्ला ता.०५-: गेली 17-18 वर्षे आपण नेहमी जनतेच्या आशिर्वादामुळेच आज आडेली पंचायत समिती मतदारसंघातून रिंगणात आहे. त्यामुळे या मतदारसंघातील जनता निश्चितच आपल्याला आशीर्वादरुपी साथ देऊन विजयी करेल, असा विश्वास आडेली पंचायत समिती मतदारसंघाचे ( अपक्ष ) उमेदवार जनार्दन उर्फ समीर रुकमांगद कुडाळकर यांनी प्रचाराच्या अंतिम टप्प्यात आडेली कामळेवीर येथे प्रचारात बोलताना व्यक्त केला. आडेली, मठ,…

Read Full News

You cannot copy content of this page