Headlines

Global Maharashtra Breaking News

सावंतवाडीत ‘बेक्स अँड ब्रूज’ कॅफेचे आज उद्घाटन…

⚡सावंतवाडी, ता. १०-: शहरातील खाद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी असून सावंतवाडीत “बेक्स अँड ब्रूज’” या नवीन कॅफेचा भव्य उद्घाटन सोहळा मंगळवार, १० फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता होणार आहे. मोती तलावाजवळील पंचम हाइट्स इमारतीच्या पहिल्या मजल्यावर हे कॅफे सुरू होत आहे. ग्राहकांना ताज्या बेकरी पदार्थांसह विविध प्रकारची कॉफी, बर्गर, पिझ्झा, सँडविचेस आदी पदार्थांचा आस्वाद एका आरामदायी…

Read Full News

आंगणेवाडीत भराडी देवी यात्रेला भक्तांचा महासागर; पहाटेपासून दर्शनासाठी रांगा…

⚡मालवण ता.०९-:हाकेला धावणारी व नवसाला पावणारी देवी म्हणून ख्याती असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या वार्षिक यात्रेला आज पहाटेपासून मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. श्री भराडी देवीची पूजाअर्चा झाल्यावर पहाटे साडे तीन वाजल्यापासून दर्शन व ओटी भरण्यास सुरुवात करण्यात आली. यावेळी भराडी देवीचे रूप वस्त्रालंकार व फुलांनी सजविण्यात आले होते. तर मंदिराचा गाभारा…

Read Full News

मालवणात महायुतीचा झंझावात; जि.प. ६ तर पं.स. १२ जागांवर दणदणीत विजय…

मालवण दि प्रतिनिधी तब्बल नऊ वर्षांनी पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मालवण तालुक्यात भाजप आणि शिंदे शिवसेना महायुतीने भरघोस यश संपादन केले या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या ६ आणि पंचायत समितीच्या १२ अशा एकूण १८ जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवत विरोधकांना धोबीपछाड दिली आहे. मालवण तालुक्यातील जि प आणि प स निवडणुकिसाठी…

Read Full News

मैत्री, आठवणी आणि जिव्हाळ्याचा संगम…

मळगाव इंग्लिश स्कूल १९९१-९२ दहावी बॅचचा गेट-टुगेदर उत्साहात संपन्न.. ⚡सावंतवाडी ता.०९-: विद्यार्थी जीवनात जपलेल्या आठवणी, शाळेच्या कट्ट्यावर रंगलेल्या गप्पा, वर्गातले खोडकर क्षण आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर खंबीर साथ देणारी मैत्री या साऱ्यांचा हृदय संगम म्हणजेच गेट-टुगेदर. काळ कितीही पुढे गेला तरी शालेय जीवनाच्या आठवणी मनाच्या कप्प्यात तशाच ताज्या असतात, याचीच प्रचिती मळगाव इंग्लिश स्कूल, मळगावच्या…

Read Full News

सिंधुदुर्गात महायुतीचा झेंडा; ५० पैकी ४१ जागांवर दणदणीत विजय…

सिंधुदुर्गनगरी ता ९सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या एकूण ५० जागा लढवल्या त्यापैकी ४१ जागा जिंकून महायुतीने निर्विवाद यश संपादन केले आहे. जिल्ह्यात महाविकास आघाडीचे अस्तित्वच संपले आहे. महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे हे फळ असल्याचे मत भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका पार पडल्या ,७…

Read Full News

कणकवलीत भाजपचा झंझावात; राणेंच्या नेतृत्वाखाली एकतर्फी विजय…

उ. बा. ठा. सेनेचा दारूण पराभव, नाटळ येथील उमेदवाराचे डिपॉझिट जप्त:कणकवली तालुक्यात जि.प.चे सदस्य ६ भाजप, १ शिंदे सेना, १ अपक्ष विजयी.. ⚡कणकवली ता.०९-: तालुक्यात भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व कायम राहिले. पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीने नियोजनबद्ध निवडणूक लढवली. यात प्रमुख विरोधक असलेला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कुठेही शिल्लक राहिला नाही असेच…

Read Full News

कुडाळ-मालवणचा विकास हेच ध्येय, भ्रष्टाचाराला थारा नाही…

आमदार निलेश राणे:विरोधकांवर हल्लाबोल.. ⚡कुडाळ ता.०९-: कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात जनतेने दिलेल्या एकतर्फी कौलाचा नम्रपणे स्वीकार करत आमदार निलेश राणे यांनी जनतेचे मनापासून आभार मानले आहेत. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विरोधकांवर, विशेषतः उबाठा गटावर जोरदार हल्लाबोल केला, तसेच आगामी काळात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून भ्रष्टाचारमुक्त कारभार आणि विकासाची ग्वाही दिली. दरम्यान विकासाच्या वाटेवर…

Read Full News

वंदेभारत एक्स्प्रेसची गुरांना धडक ; कोकण रेल्वे वाहतूक साडेतीन तास ठप्प …

अपघातामुळे कुडाळ-सिंधुदुर्ग दरम्यान रेल्वेची विद्युत यंत्रणा कोलमडली :अनेक गाड्या कुडाळ, झाराप, सावंतवाडी, कणकवली स्थानकावर उभ्या.. कुडाळ : कुडाळ आणि सिंधुदुर्ग स्थानकादरम्यान अचानक बैल आणि म्हैस रुळावर आल्याने मडगावच्या दिशेने जाणारी वंदेभारत एक्स्प्रेसची धडक त्यांना बसली. त्यात त्या जनावरांचा मृत्यू झालाच पण एक जनावर रेल्वेच्या ओव्हरहेड विद्युत खांबाला धडकल्याने तो खांब वाकला आणि विद्युत पुरवठा खंडित…

Read Full News

सावंतवाडीत प्रस्थापितांना धक्का; अपक्षांचा दमदार उदय…

⚡सावंतवाडी ता.०९-:येथील तालुक्यात पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रस्थापितांना धोबीपछाड देत अपक्षांनी बाजी मारली.तालुक्यातील एकूण जिल्हा परिषदेमध्ये ५ ठिकाणी भाजप, ३ ठिकाणी अपक्ष तर १ जागेवर शिंदे शिवसेनेने बाजी मारली. तर पंचायत समितीमध्ये ५ ठिकाणी अपक्ष, ६ ठिकाणी शिंदे शिवसेना, ६ ठिकाणी भाजप तर १ जागेवर उबाठाने बाजी मारली तालुक्यात लाज राखली. आंबोली, माडखोल,…

Read Full News

शिंदे शिवसेनेचे विजयी उमेदवार व कार्यकर्त्यांनी संजू परब यांच्या कार्यालयाकडे केला जल्लोष…

⚡सावंतवाडी ता.०९- : आरोंदा जिल्हा परिषद मतदारसंघातून शिंदे शिवसेनेचे उमेदवार सुदा कवठणकर तसेच पंचायत समितीचे उमेदवार यांनी दणदणीत विजय मिळविल्यानंतर संजू परब यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला. संजू परब यांच्या कार्यालयाकडे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र जमले होते. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. “शिंदे शिवसेनेचा विजय असो” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून…

Read Full News

You cannot copy content of this page