Headlines

Global Maharashtra Breaking News

हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी…

भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत.. ओरोस ता १६काँग्रेस पक्ष हा नेहमीच हिंदू द्वेष करत आला आहे. आपल्या वाक्यातून सांप्रदायिक द्वेष कसा पसरवता येईल याकडे या पक्षाच्या नेत्यांचे नेहमीच लक्ष असते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांना समकक्ष पहावे अशी टिप्पणी हा त्याचाच एक भाग आहे. त्यामुळे हर्षवर्धन सकपाळ यांनी माफी…

Read Full News

स्वराज्य संघटना सावंतवाडी यांच्या वतीने १९ रोजी शिवजयंतीनिमित्त भव्य “शिवचेतना” रॅलीचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.१७-: स्वराज्य संघटना सावंतवाडी यांच्या वतीने १९ फेब्रुवारी गुरुवारी शिवजयंतीनिमित्त भव्य “शिवचेतना” रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ठीक १० वाजता राजवाडा येथून या रॅलीला प्रारंभ होणार आहे. छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात येणारी ही रॅली राजवाडा येथून सुरू होऊन बाजारपेठ मार्गे शहरातून मार्गक्रमण करणार आहे. रॅलीमध्ये घोडे, ढोल-ताशांचा गजर आणि पारंपरिक…

Read Full News

उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर प्रवीण भोंसले यांचा वाढदिवस कार्यक्रम रद्द…

⚡सावंतवाडी ता.१७-: प्रवीण भोंसले यांनी यंदा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. दरवर्षी प्रवीण भोंसले मित्र मंडळाच्या वतीने १९ फेब्रुवारी रोजी सामाजिक व आनंदी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मात्र, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या अकाली निधनामुळे राज्याची जनता अजूनही दुःखातून सावरलेली नसल्याने हा निर्णय घेतला आहे. प्रवीण भोंसले यांनी जारी केलेल्या पत्रात…

Read Full News

रेडी जि.प. सदस्य प्रीतेश राऊळ व रेडी पं .स.सदस्य प्रीयांका घाटवळ यांचा भाजप पदाधिकाऱ्यांकडून सत्कार…

⚡वेंगुर्ला ता.१७-: वेंगुर्ला तालुक्यातील रेडी जि.प. सदस्य म्हणून विजयी झालेले प्रीतेश राऊळ व रेडी पं.स.सदस्य विजयी उमेदवार प्रीयांका घाटवळ यांचा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळु देसाई व जि.का.का.सदस्य व उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर त्यांच्या हस्ते रेडी येथे सत्कार करण्यात आला. यावेळी रेडी सरपंच रामसिंग राणे, शिरोडा माजी सरपंच मनोज उगवेकर उपस्थित होते.वेंगुर्ले तालुक्यातील रेडी जि.प…

Read Full News

मालवणच्या समुद्रात एकाचवेळी बहुसंख्य डॉल्फिनचे दर्शन…

⚡मालवण ता.१७-: डॉल्फिन दर्शनासाठी प्रसिद्ध असलेल्या मालवणच्या समुद्रात एकाच वेळी ७० ते ७५ डॉल्फिनचे दर्शन झाल्याचे अनोखे दृश्य सागरी जीव अभ्यासक विशाल भावे यांनी आपल्या ड्रोन कॅमेऱ्यात टिपले आहे. एवढ्या मोठ्या संख्येने डॉल्फिन मासे एकत्रित समुद्रात विहार करताना प्रथमच दिसून आले आहेत. मालवणसह तारकर्ली, देवबाग पर्यंतच्या समुद्रात डॉल्फिन माशांचे दर्शन होत असते. हे डॉल्फिन पर्यटकांचेही…

Read Full News

मळगाव येथे १८ फेब्रुवारी ते १८ मार्च कालावधीत ‘छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मास’ चे आयोजन…

मळगाव येथील शिवशंभू ग्रुपच्यावतीने आयोजन.. ⚡सावंतवाडी ता.१७-: मळगाव येथील शिवशंभू ग्रुपच्यावतीने १८ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत जिल्हा परिषद शारदा विद्यालय मळगाव रस्ता शाळेच्या पटांगणावर ‘छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मास’ चे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवन, त्याग आणि बलिदान हे आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांमधून तरुणांमध्ये इतिहासाबद्दल जागृती…

Read Full News

सोमवतीनिमित्त उपवडेच्या ग्रामदेवतेचे सागरेश्वर किनारी तीर्थस्नान…

⚡वेंगुर्ला ता.१६-: सोमवती अमावास्येनिमित्त कुडाळ तालुक्यातील उपवडे गावची ग्रामदेवता आणि तरंगदेवतांनी आपल्या भक्तांसह आज सोमवारी सायंकाळी वेंगुर्ला येथील सागरेश्वर किनारी तीर्थस्नान केले. सोमवारी अमावास्या आल्याने तीर्थस्नान करण्यासाठी उपवडे गावची श्री पावणाई-रवळनाथ आदी ग्रामदैवत पालखीसह तसेच श्री रवळनाथ, श्री भूतनाथ आणि श्री पावणाई आदी तरंगदेवता यांचे वेंगुर्ला येथे आगमन झाले आहे. वेंगुर्ला शहरात प्रवेश केल्यानंतर या…

Read Full News

कणकवलीत लॉजमध्ये तरुणाचाआढळला मृतदेह…

⚡कणकवली ता.१६-: बस – स्थानकासमोरील एका लॉजमध्ये दोन दिवसांपासून भाड्याने राहत असलेला एक तरुण मृतावस्थेत आढळून आल्याची घटना आज, १६ फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.याबाबतची माहिती लॉजचे मालकांनी कणकवली पोलीस ठाणे येथे दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

Read Full News

भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी बनवली गो-कार्ट…

कोईमतूर येथील राष्ट्रीय स्पर्धेत करणार कोकणाचे प्रतिनिधित्व…. ⚡सावंतवाडी ता १७-: यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी कौशल्य, नवकल्पकता आणि टीमवर्कचे उत्कृष्ट उदाहरण सादर करत राष्ट्रीय स्तरावरील “गो कार्ट डिझाईन चॅलेंज” स्पर्धेसाठी आकर्षक व तांत्रिकदृष्ट्या सक्षम अशी गो-कार्ट तयार केली आहे. कोईमतूर येथे 20 ते 24 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या तेराव्या राष्ट्रीय गो-कार्ट स्पर्धेत ही कार…

Read Full News

सावरवाड येथील स्फटिक शिवलिंग मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भव्य भस्म आरती…

⚡मालवण ता.१६-:ओम नमः शिवाय… हर हर महादेव असा शिवनामाचा जप करीत सावरवाड येथील प्रसिद्ध स्फटीक शिवलिंग मंदिरात रविवारी मध्यरात्री रुद्रनाद फाउंडेशनचे सर्वेसर्वा श्री रुद्रराज यांनी साधकांसमवेत केलेली भस्म आरती हजारो शिवभक्तांनी अनुभवली. महाशिवरात्रीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या भस्म आरतीच्या वेळी उपस्थितानी हर हर महादेव नामाचा जयघोष करत महाशिवरात्रीचा जागर केला. सावरवाड येथील अलीकडे नव्याने बांधण्यात…

Read Full News

You cannot copy content of this page