Headlines

Global Maharashtra Breaking News

सामाजिक क्षेत्रात तेढ निर्माण करणाऱ्या “त्या” ग्रामस्थांला कायदा सुव्यवस्थेतून हद्दपार करा

अन्यथा तीव्र आंदोलन; न्हावेली ग्रामस्थांचा तहसीलदार म्हात्रे यांना निवेदनाद्वारे इशारा* *💫सावंतवाडी दि.१२-:* न्हावेली ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामसेवक तृप्ती राणे त्यांच्यावर वेळेत उपस्थित न राहणे व मनमानी कारभारा संदर्भात आरोप करत ग्रामस्थ संदीप मांजरेकर यांनी दिलेला उपोषणाचा इशारा चुकीचा व खोडसाळ असून सामाजिक क्षेत्रात तेढ निर्माण करणाऱ्या या व्यक्तीला कायदा सुव्यवस्थेतून हद्दपार करण्यात यावे अशी मागणी…

Read Full News

पंचायत समिती सभापती पदाच्या निवडणुकीसाठी मनोज रावराणे यांच्याकडून अर्ज दाखल

कणकवली पं स सभापतीपदासाठी मनोज तुळशीदास रावराणे यांनी आपले नामनिर्देशन पीठासीन अधिकारी रमेश पवार यांच्याकडे दाखल केले. खासदार नारायण राणे यांनी पं स सभापतीपदी मनोज रावराणे यांच्या नावाला पसंती दिल्याचा बंद लिफाफा भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे, मिलिंद मेस्त्री यांनी खासदार नारायण राणे यांच्या संपर्क कार्यालयात पं स सदस्य आणि भाजपा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत फोडला. खासदार राणे…

Read Full News

घारपी-बांदा एसटीला अपघात

विद्यार्थ्यांसह प्रवासी जखमी ; जखमींना उपचारासाठी बांदा आरोग्य केंद्रात केले दाखल *💫बांदा दि.१२-:* आज सकाळी घारपीहुन बांद्याच्या दिशेने येताना घारपी-बांदा ही एसटी घारपी घाटात कोसळून अपघातग्रस्त झाली. ही घटना आज सकाळी (मंगळवारी) घडली. या दुर्घटनेत विद्यार्थ्यांसह काही प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Read Full News

वेंगुर्ले भाजपाच्या वतीने आज राजमाता जिजाऊ पुरस्कार कार्यक्रम

*💫वेंगुर्ला दि.१२-:* वेंगुर्ले भाजपाच्या वतीने तालुका कार्यालयात आज मंगळवार १२ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता ‘राजमाता जिजाऊ जयंती’ निमित्त कोकण विकास आघाडीच्या पदाधिकारी व गोरेगाव – मुंबई येथील भाजपा महिला नेत्या सुमन सावळ यांच्या हस्ते जिजाऊ पुरस्कार देण्यात येणार आहेत. तसेच स्वामी विवेकानंद जयंती निमित्त प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरदजी चव्हाण यांच्या हस्ते स्वामी विवेकानंदांच्या प्रतीमेस…

Read Full News

अखेर त्या डॉक्टरांची मृत्यूशी झुंज अपयशी

*💫कणकवली दि.११.-:* उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधीक्षक डॉ एस एस पाटील यांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. आज रात्री साडेनऊ वाजता त्यांचे कोल्हापूर येथे उपचारादरम्यान निधन झाले. कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ सहदेव पाटील ब्रेन हॅमरेज मुळे कोल्हापूर येथील सिद्धांत हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. सोमवार ४ जानेवारी रोजी सकाळी मॉर्निंग वॉक ला गेले असतानाच त्यांना…

Read Full News

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या कारला भीषण अपघात,

पत्नीचा मृत्यू, नाईक गंभीर जखमी *💫पणजी दि.११-:* केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या कारला भीषण अपघात झाला असून, या अपघातात श्रीपाद नाईक आणि त्यांची पत्नी गंभीर जखमी झाले. दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या श्रीपाद नाईक यांच्या पत्नी विजया नाईक यांचा मृत्यू झाला आहे. तर गंभीर जखमी असलेल्या श्रीपाद नाईक यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे…

Read Full News

काँगेसच्या वतीने आरवली – सागरतीर्थ ग्रा.प.निवडणूक प्रचाराचा शुभारंभ…

*💫वेंगुर्ला दि.११-:* वेंगुर्ला तालुक्यातील आरवली व सागरतीर्थ या दोन ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुका होत आहेत.दरम्यान आज आरवली गावचे ग्रामदैवत श्री देव वेतोबा चरणी वेंगुर्ले राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक विधाता सावंत यांच्या हस्ते श्रीफळ ठेऊन निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष इर्शाद शेख,नगरसेवक प्रकाश डिचोलकर,पं .स.उपसभापती सिद्धेश उर्फ भाई परब,माजी सभापती जगन्नाथ डोंगरे,विभागीय…

Read Full News

मंगेश तळवणेकर परत एकदा मुक्या जनावरांच्या मदतीला…

*💫सावंतवाडी दि११-:* तालुक्यात मळगाव गावात एक विशिष्ट प्रकारचा आजार जनावरांमध्ये आढळून आला आहे. याचा फटका मळगाव येथील एका गायीला बसला.यासंबंधीची माहिती विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्री मंगेश तळवणेकर यांना कळताच ते डॉक्टरांची टीम घेत घटनास्थळी दाखल झाले आणि संबंधित गायींवर उपचार सुरू केले.उद्याही अशीच मोहीम राबवली जाणार आहे. अशी माहिती श्री. तळवणेकर यांनी दिली…

Read Full News

किनारपट्टीवर सागरी सुरक्षा कवच मोहीम…

*💫मालवण दि.११-:* सागरी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण समजली जाणारी सागरी सुरक्षा कवच मोहिम मंगळवार १२ जानेवारी रोजी सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होत आहे. वेंगुर्ले ते विजयदुर्ग या किनारपट्टी भागात ३६ तास ही मोहीम चालणार आहे. पोलीस प्रशासनाच्या रेड व ब्ल्यू टीम मोहिमेत सहभागी होणार असून रेड टीमचे कवच भेदण्यासाठी स्थानिक पोलीस प्रशासनाची ब्ल्यू टीम सज्ज झाली…

Read Full News

*मालवण-पोईप धनगरवाडी येथील तरुणाची गळफासाने आत्महत्या

पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद *💫मालवण दि.११-:* मालवण तालुक्यातील पोईप धनगरवाडी येथील रहिवासी प्रकाश बापू शिंगाडे (वय-४०) यांचा मृतदेह आज दुपारी घरानजीकच्या फणसाच्या झाडास नायलॉन दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडून आला. याप्रकरणी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. याबाबतची खबर शेजारी रामचंद्र माने यांनी पोलिस ठाण्यात दिली आहे. आज सकाळी शिंगाडे…

Read Full News

You cannot copy content of this page