सामाजिक क्षेत्रात तेढ निर्माण करणाऱ्या “त्या” ग्रामस्थांला कायदा सुव्यवस्थेतून हद्दपार करा

अन्यथा तीव्र आंदोलन; न्हावेली ग्रामस्थांचा तहसीलदार म्हात्रे यांना निवेदनाद्वारे इशारा*

*💫सावंतवाडी दि.१२-:* न्हावेली ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामसेवक तृप्ती राणे त्यांच्यावर वेळेत उपस्थित न राहणे व मनमानी कारभारा संदर्भात आरोप करत ग्रामस्थ संदीप मांजरेकर यांनी दिलेला उपोषणाचा इशारा चुकीचा व खोडसाळ असून सामाजिक क्षेत्रात तेढ निर्माण करणाऱ्या या व्यक्तीला कायदा सुव्यवस्थेतून हद्दपार करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. भविष्यात अधिकारी व प्रशासकीय वर्ग यांना वेठीस धरुन विकास कामासंदर्भात तक्रारी होत राहिल्यास ग्रामस्थांकडून अनुचित प्रकार घडू शकतो आणि त्याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील त्यासाठी आम्हाला योग्य तो न्याय द्या अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा न्हावेली गावातील शेकडो ग्रामस्थांनी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना दिला आहे. न्हावेली येथील ग्रामस्थ आणि महिलांनी यासंदर्भातील निवेदन पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांच्यासह सहाय्यक गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांनाही सादर केले आहे. या निवेदनावर गावातील शेकडो ग्रामस्थांच्या सह्या आहेत. या निवेदनामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, ग्रामस्थ संदीप मांजरेकर याने गटविकास अधिकारी यांच्याकडे ग्रामसेविका तृप्ती राणे यांच्या प्रशासकीय कामकाजाची चौकशी संदर्भात अर्ज दाखल केलेला असून, आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे. श्री मांजरेकर यांनी यापूर्वीही बऱ्याच वेळा न्हावेली ग्रामपंचायतीकडे माहितीच्या अधिकारात माहिती मागितली आहे. याची अपिलीय सुनावणी झाली पण त्यातून काहीच निष्पन्न न झाल्याने त्यांनी केलेले यापूर्वीचे आरोप बिनबुडाचे असल्याचे निदर्शनास आले आहेत. मुळात एका ही ग्रामसभेला उपस्थित न राहता 2014 पासून गावात कोणतेही विकासकाम आल्यास त्याला विरोध करणे हे त्याचे नित्याचेच काम बनले आहे. न्हावेली गोमेवाडी ते रेवेवाडी रस्त्यावर टाकलेल्या खडी संदर्भात तक्रार करून ते काम बंद पाडले व ते काम रद्द देखील झाले आहे. त्यामुळेच अद्यापपर्यंत या रस्त्याचे काम झालेले नाही अशा प्रकारच्या तक्रारी ही त्यांनी केलेले आहेत त्यामुळे तक्रार अर्ज दाखल करून अडथळे निर्माण करणे व सामाजिक क्षेत्रात तेढ निर्माण करणे असे उपद्व्याप मांजरेकर करत आहेत. श्री मांजरेकर यांच्या कुरापतीमुळे सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा कार्यालयीन वेळ या कामातच जातो त्यामुळे गावची वसुली इतर कार्यालयीन कामकाजावर परिणाम होतो त्याने ग्रामसेविका तृप्ती राणे यांच्यावर केलेला आरोपही बिनबुडाचा आहे. कारण ग्रामसेवक या नात्याने आपल्या कालावधीत गावाच्या विकासाच्या दृष्टीने त्यांनी मोठे योगदान दिले आहे गावात बायोगॅस योजना दरवर्षी राबवुन शेतकऱ्यांना अनुदान मिळवून दिले आहे त्यांच्या कालावधीमध्ये संत गाडगेबाबा जिल्हास्तरीय पुरस्कार ग्रामस्वच्छता अभियान तसे स्मार्ट ग्राम पुरस्कार असे अनेक पुरस्कार गावाला मिळाले आहेत. तरी भविष्यात विकास कामासंदर्भात अशाच तक्रारी होत राहिल्यास ग्रामस्थांना कायदा-सुव्यवस्था हातात घेऊन अनुचित प्रकार करण्यास भाग पडावे लागेल आणि त्या सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील त्यामुळे ग्रामस्थांनी कायदा-सुव्यवस्था हातात घेऊ नये यासाठी सदर व्यक्तीला कायदा-सुव्यवस्थेचा वापर करून हद्दपार करण्याची तरतूद करावी त्यासाठी प्रशासनाला लागणारे सर्व सहकार्य करण्यास ग्रामस्थ तयार आहेत याबाबत कारवाई करण्यात यावी तसेच ग्रामस्थांना योग्य न्याय न मिळाल्यास ग्रामस्थांच्या वतीने ह तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी हेमचंद्र सावळ, संजय दळवी, शरद धाऊसकर, भिवा नाईक, रामचंद्र परब, लक्ष्मण धाऊसकर, आरती परब, जयश्री नाईक, विशाल गावडे, रवींद्र मांजरेकर, सानिया हरमलकर, सुदर्शना मांजरेकर, प्रसाद मांजरेकर, दिया हरमलकर, संजना कोचरेकर, लक्ष्मी कोचरेकर, कल्पना कोचरेकर, सायली न्हावेलकर आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page