कणकवली पंचायत समिती सभापतीपदी मनोज रावराणे यांची बिनविरोध निवड…

*💫कणकवली दि.१२-:* पंचायत समिती सभापतिपदी मनोज तुळशीदास रावराणे यांच्या बिनविरोध निवडीची अधिकृत घोषणा पीठासीन अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी रमेश पवार यांनी जाहीर केली. कणकवली पं स च्या सभापती पदासाठी आज झालेल्या निवडणुकीत मनोज रावराणे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे रावराणे यांच्या निवडीची अधिकृत औपचारिक घोषणा होणे बाकी होते. दुपारी ३ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी रमेश पवार यांनी मनोज रावराणे यांची सभापतिपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. लोरे घोणसरी पं स मतदारसंघातून मनोज रावराणे पं स सदस्यपदी निवडून आले होते. आमदार नितेश राणे यांच्या अत्यंत जवळचे आणि निष्ठावान कार्यकर्ते असलेल्या मनोज रावराणे याना निष्ठेचे फळ मिळाले आहे. पं स सदस्यत्वाच्या अखेरच्या वर्षीच्या टर्मममध्ये लोकाभिमुख आणि गतिमान कारभार करून जनतेची कामे जलदगतीने पूर्ण करण्यावर आपला भर असणार असल्याचे रावराणे यांनी आपल्या निवडीनंतर बोलताना सांगितले. आमदार नितेश राणे यांना अभिप्रेत काम करणार असल्याचेही रावराणे म्हणाले. पं स सभापतीपदी रावराणे यांच्या निवडीची अधिकृत घोषणा होताच पं स आवारात ढोल पथकाच्या तालावर भाजपा कार्यकर्त्यांनी आणि रावराणे समर्थकानी जल्लोष केला. यावेळी पं स चे माजी उपसभापती तुळशीदास रावराणे, भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे, मिलिंद मेस्त्री, माजी पं स सभापती दिलीप तळेकर, पं स सदस्य प्रकाश पारकर, लोरे नं १ सरपंच अजय रावराणे, उपसरपंच अनंत रावराणे, माजी सरपंच सुमन गुरव, माजी उपसरपंच नरेश गुरव , वैभववाडी माजी उपसभापती बंड्या मांजरेकर तसेच लोरे नं १ गावातील शेकडो नागरिक उपस्थित होते.

You cannot copy content of this page