पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद
*💫मालवण दि.११-:* मालवण तालुक्यातील पोईप धनगरवाडी येथील रहिवासी प्रकाश बापू शिंगाडे (वय-४०) यांचा मृतदेह आज दुपारी घरानजीकच्या फणसाच्या झाडास नायलॉन दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडून आला. याप्रकरणी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. याबाबतची खबर शेजारी रामचंद्र माने यांनी पोलिस ठाण्यात दिली आहे. आज सकाळी शिंगाडे यांच्या घरातील मंडळी कामानिमित्त बाहेर गेली होती. यादरम्यान दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास प्रकाश शिंगाडे यांचा मृतदेह फणसाच्या झाडाला गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला. हा प्रकार शेजारच्यांच्या लक्षात येताच त्यांनी याची माहिती मसुरे पोलिस दुरक्षेत्रास दिली. प्रकाश यांना दारूचे व्यसन होते. अधिक तपास मसुरे पोलिस दुरक्षेत्राचे प्रमोद नाईक हे करत आहेत. त्यांच्यामागे पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.
