वेंगुर्ले भाजपाच्या वतीने आज राजमाता जिजाऊ पुरस्कार कार्यक्रम

*💫वेंगुर्ला दि.१२-:* वेंगुर्ले भाजपाच्या वतीने तालुका कार्यालयात आज मंगळवार १२ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता ‘राजमाता जिजाऊ जयंती’ निमित्त कोकण विकास आघाडीच्या पदाधिकारी व गोरेगाव – मुंबई येथील भाजपा महिला नेत्या सुमन सावळ यांच्या हस्ते जिजाऊ पुरस्कार देण्यात येणार आहेत. तसेच स्वामी विवेकानंद जयंती निमित्त प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरदजी चव्हाण यांच्या हस्ते स्वामी विवेकानंदांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. तरी तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना ऊर्फ बाळु देसाई व तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर व स्मिता दामले यांनी केले आहे.

You cannot copy content of this page