Headlines

Global Maharashtra Breaking News

शिवसेनेकडून वर्षा कुडाळकर यांचा अर्ज दाखल…

जिल्हा परिषद अध्यक्ष निवड *💫सिंधुदुर्गनगरी-:* जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी शिवसेनेकडून वर्षा कुडाळकर यानी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी आ वैभव नाईक, संदेश पारकर, जिल्हा प्रमुख संजय पडते, संजय आंग्रे, राजलक्ष्मी डिचवलकर, प्रदीप नारकर आदी उपस्थित होते.

Read Full News

भाजपकडून पूनम ढवण तथा संजना सावंत निश्चित…

*💫सिंधुदुर्गनगरी दि.२४-:* सिंधूदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी सत्ताधारी भाजपने माजी अध्यक्षा तथा पूनम ढवण या नावाने माहेरवाशिनी असलेल्या संजना सावंत यांची निवड केली आहे. गटनेते रणजीत देसाई, माजी अध्यक्षा रेश्मा सावंत, सरोज परब यानी जिल्हा परिषदेत दाखल होत उमेदवारी अर्ज घेतला आहे.

Read Full News

एलपीजी गॅस व विमा सवलत दया…

.रिक्षा चालक मालक संघटनेशी मागणी;उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिले निवेदन सावंतवाडी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एलपीजी गॅस पंप तात्काळ सुरू करण्यात यावेत तसेच रिक्षाचालकांना विमा सवलत देण्यात यावी या मागणीसह विविध प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी सिंधुदुर्ग रिक्षा चालक-मालक संघटनेच्या वतीने सिंधुदुर्ग उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. कोरोना काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे…

Read Full News

सेनेने वर्षा कुडाळकर, स्वरूपा विखाळे यांच्या नावाने घेतले अर्ज..

जिल्हा परिषद अध्यक्ष निवड:भाजप अजुन शांत सिंधूदुर्गनगरी ता २४ जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी शिवसेनेने वर्षा कुडाळकर व स्वरूपा विखाळे यांच्या नावाचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा सिंघन यांच्याकडून खरेदी केले आहेत. प्रदीप नारकर, नितिन शिरोडकर, राजेश कविटकर या सदस्यांनी अर्ज ताब्यात घेतले आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी आज दुपारी ३ वाजता निवडणूक होत आहे….

Read Full News

*वेंगुर्ला येथे मनसेचे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न…

९५ जणांनी घेतला आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ* वेंगुर्ले-: मनसे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या संकल्पनेतून वेंगुर्ला मनसेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबीराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. या शिबीराचे उद्धाटन रमेश पणदूरकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले आहे. यावेळी ९५ जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी डॉ.रघुनाथ गावडे (मुंबई/कणकवली) , डॉ….

Read Full News

पाणी समस्येवरुन माजी नगरसेवक सुरेश भोगटे आक्रमक…

मुख्याधिकाऱ्यांना विचारला जाब ;पाणी प्रश्न तात्काळ दूर करण्याची केली मागणी *💫सावंतवाडी दि.२४-:* सावंतवाडी शहरात गेली काही दिवस भेडसावत असलेल्या पाणी प्रश्नावरून आज माजी नगरसेवक सुरेश भोगटे हे आक्रमक झाले असून, त्यानी आज सावंतवाडी मुख्याधिकारी तसेच पाणी पुरवठा आधिकारी याची भेट घेऊन शहरात कमी प्रमाणात होणाऱ्या पाणी पुरवठ्यावरून जाब विचारला आहे.सद्य स्थितीत उन्हाळा सुरू असताना पाणी…

Read Full News

बांदा पोलीस चेकपोस्टवर बेकायदा ५० लाखांची पकडली…

बांदा : प्रतिनिधी गोव्यातून पुण्याकडे होणार्‍या गोवा बनावटीच्या बेकायदा दारु वाहतुकी विरोधात बांदा पोलीसांनी आज सकाळी बांदा चेकपोस्टवर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे तब्बल ५० लाख रुपयांचा दारुसाठा व ५ लाख रुपयांचा कंटेनर असा एकूण सुमारे ५५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर कारवाई पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी टी….

Read Full News

आंबोली नांगरतास येथे हत्तीचे दर्शन…

नांगरिकांत भीतीचे वातावरण *💫आंबोली दि-:* आंबोली नांगरतास येथे आज सकाळी ७ च्या सुमारास महाकाय रानटी हत्ती रस्ता ओलांडताना निदर्शनास आला. काही वेळ हा हत्ती रस्त्यावरच ठाण मांडून उभा होता. त्यामुळे वाहनधारकांची भीतीने चांगलीच गाळण उडाली. आंबोली सरपंच बाळा पालेकर यांच्या घरालगत हा प्रकार घडला. काही जणांनी या घटनेचे व्हिडिओ चित्रीकरण केले. जंगली हत्तींचा वावर पुन्हा…

Read Full News

कुंब्रल वासियांचे उपोषण मागे…

जिल्हाधिकार्‍यांना वाहतूक बंद करण्यासंबंधी निवेदन *दोडामार्ग / सुमित दळवी* परमे येथील राव यांच्या क्वांरीवरून होणारी खडीची वाहतूक ही उलटी शिरवल कुंब्रल मार्गे सासोली अशी होत आहे यासाठी वेळोवेळी जनप्रक्षोभ पहावयास मिळाला होता. त्यातूनच कालपासून कुंब्रल येथील रहिवाशी लक्ष्मण सावंत, जगदीश सावंत, बाबाजी नाईक व शशिकांत डेगवेकर यांनी कुंब्रल ग्रामस्थांच्या वतीने साखळी उपोषणास सुरुवात केली होती….

Read Full News

पारंपरिक मश्चिमारांचे आंदोलन बाराव्या दिवशीही सुरुच…

मत्स्य विभागाचे दुर्लक्ष मालवण (प्रतिनिधी) बंदी कालावधी असूनही समुद्रात सुरू असलेल्या एलईडी पर्ससीन मासेमारीवर मत्स्य विभागाकडून कारवाई होत नसल्याच्या विरोधात अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे जिल्हाध्यक्ष मिथुन मालंडकर यांच्या नेतृत्वाखाली पारंपारिक मच्छीमारांनी मालवण येथे सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयासमोर छेडलेले साखळी उपोषण आंदोलन आज बाराव्या दिवशीही सुरूच होते. कारवाई बाबत मत्स्य विभाग ठोस निर्णय घेत…

Read Full News

You cannot copy content of this page