सेनेने वर्षा कुडाळकर, स्वरूपा विखाळे यांच्या नावाने घेतले अर्ज..

जिल्हा परिषद अध्यक्ष निवड:भाजप अजुन शांत

सिंधूदुर्गनगरी ता २४ जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी शिवसेनेने वर्षा कुडाळकर व स्वरूपा विखाळे यांच्या नावाचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा सिंघन यांच्याकडून खरेदी केले आहेत. प्रदीप नारकर, नितिन शिरोडकर, राजेश कविटकर या सदस्यांनी अर्ज ताब्यात घेतले आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी आज दुपारी ३ वाजता निवडणूक होत आहे. यासाठी दुपारी १ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. सत्ताधारी भाजप बरोबर सेना सुद्धा या निवडणुकीत उतरणार असल्याचे निश्चित झाले आहे. ही निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, भाजप अजुन उमेदवारी अर्ज घेण्यासाठी आलेली नाही. त्यामुळे भाजप उमेदवार कोण हे समजू शकलेले नाही.

You cannot copy content of this page