Headlines

Global Maharashtra Breaking News

गगनगडावर २४ ते २६ एप्रिल दरम्यान भव्य संत सोहळा…

⚡वैभववाडी ता.२१-: महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेतील एक ऐतिहासिक सुवर्ण योग येत्या २४ ते २६ एप्रिल दरम्यान येथे जुळून येणार असून या निमित्ताने भव्य दिव्य संत सोहळ्याचे श्री क्षेत्र गगनगड गगनबावडा जिल्हा कोल्हापूर येथे आयोजन करण्यात आले आहे.या सोहळ्यानिमित्त संतश्रेष्ठ माऊली यांच्या ७५० वा जन्मोत्सव श्री भक्त शिरोमणी संतश्रेष्ठ नामदेव महाराज यांचा ६७५ वा समाधी सोहळा,तसेच तुकाराम…

Read Full News

*पालकमंत्री नितेश राणे घेतला व्यावसायिक गॅस पुरवठ्याचा आढावा…

हॉटेल व व्यापारी संघटनांच्या समस्याही जाणून घेतल्या.. ⚡सिंधुदुर्गनगरी,ता.२१-: व्यावसायिक गॅस पुरवठ्याबाबत पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली BPCL, IOCL आणि HPCL या तीनही कंपन्यांच्या समन्वयकांची तसेच जिल्ह्यातील हॉटेल व व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींची आढावा बैठक पार पडली. पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्यावसायिक गॅस पुरवठा सुरळीत राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. व्यावसायिक गॅसच्या तुटवड्यामुळे अनेक हॉटेल्स बंद पडण्याच्या…

Read Full News

२३ मार्चला मुंबई – गोवा महामार्गावर चक्काजाम आंदोलन…

कणकवलीत राजू शेट्टींचा इशारा. कणकवली : आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या झालेल्या मोठ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर येत्या २३ मार्च रोजी सकाळी १०:३० वाजता नांदगाव येथे मुंबई-गोवा महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला. कणकवली येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सुशांत नाईक, संजय नरे,…

Read Full News

राज्यस्तरीय गुरुकुल स्पर्धा परीक्षेत घारपी शाळेची चमकदार कामगिरी…

⚡बांदा ता.२१-: राज्यस्तरीय गुरुकुल स्पर्धा परीक्षेत घारपी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी शंभर टक्के निकालाची अभिमानास्पद कामगिरी करत शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे.गुरूकुल एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर यांच्या वतीने जानेवारी २०२६मध्ये घेण्यात आलेल्या या राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत इयत्ता पहिलीतील किर्ती राजेंद्र गावकर हिने उल्लेखनीय यश संपादन करत जिल्ह्यात आठवा क्रमांक तसेच राज्यात तेरावा क्रमांक पटकावला…

Read Full News

बांद्यात २३ मार्चला ‘सिंधु आरोग्य मेळावा…

⚡बांदा ता.२१-: सिंधुदुर्ग जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागामार्फत सोमवार २३ मार्च रोजी बांदा येथे ‘सिंधु आरोग्य मेळावा” चे आयोजन करण्यात आले आहे. बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत हा मेळावा संपन्न होईल.या मेळाव्याचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी जि. प. उपाध्यक्ष तुकाराम साईल, सावंतवाडी…

Read Full News

मालवणचे उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांची कर्तव्य दक्षता…

मालवण नळपाणी योजनेचे अपव्यय होणारे पाणी बंद करण्यासाठी केली गेटव्हॉल्वची दुरुस्ती.. ⚡मालवण ता.२१-: धामापूर पाणीपुरवठा योजनेच्या कुंभारमाठ येथील पाणी साठवणूक करणाऱ्या टाकीजवळील मुख्यवाहिनीवरील आणि मालवण शहरातील उपवाहिन्यांवरील तीस वर्षांपूर्वी बसविण्यात आलेले पाण्याचे गेटव्हॉल्व खराब झाल्याने पाण्याचा होणारा अपव्यय निदर्शनास येताच मालवणचे उपगराध्यक्ष आणि पाणीपुरवठा समितीचे सभापती दिपक पाटकर यांनी पुढाकार घेत खराब झालेल्या नळपाणी योजनेच्या…

Read Full News

जिल्ह्यात लवकरच होणारा उमेद मॉल बचतगटांना फायदेशीर…

पालकमंत्री नितेश राणे:सिंधूसरस प्रदर्शन आणि विक्रीचा शानदार शुभारंभ;कुडाळ हायस्कुलच्या मैदानावर बचतगट उत्पादनाचा महामेळा.. ⚡कुडाळ ता.२१-: प्रत्येक जिल्ह्यात आता महायुती सरकारच्या माध्यमातून उमेद मॉल उभा राहणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा लवकरच उमेद मॉल उभा राहील. त्यावेळी या बचतगट चळवळीला अधिक वेग येईल. त्या दृष्टीनं येथील महिला बचतगटांनी सिंधूसरस प्रदर्शनाचा उपयोग करून घ्यावा असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री…

Read Full News

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सीताराम गावडे यांचा सन्मान…

⚡सावंतवाडी ता.२१-: गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर समाजातील अन्याय, अमली पदार्थांचा विळखा आणि अवैध धंद्यांविरोधात ठामपणे आवाज उठवणाऱ्या कोकण लाईव्ह ब्रेकींग न्यूज चॅनेलचे संपादक तथा सकल मराठा व हिंदू समाजाचे जिल्हाध्यक्ष सीताराम गावडे यांचा राजा शिवाजी चौक मित्र मंडळाच्या वतीने जंगी सत्कार करण्यात आला.शाल, श्रीफळ आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन झालेला हा सन्मान केवळ औपचारिक नव्हता, तर…

Read Full News

सिंधुदुर्ग रिन्यूएबल एनर्जी असोसिएशनची स्थापना; सोलर क्षेत्राच्या विकासासाठी एकत्र येण्याचा निर्धार…

⚡मालवण ता.२१-:गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सोलर क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यावसायिकांच्या सिंधुदुर्ग रिन्यूएबल एनर्जी असोसिएशनच्या अध्यक्षपदी श्री. आशिष कोरगावकर यांची तर सचिवपदी श्री. किशोर दाभोलकर यांची तसेच खजिनदारपदी श्री. बाळकृष्ण सावंत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे जिल्ह्यातील सोलर क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यावसायिकांची कुडाळ येथे बैठक संपन्न झाली या बैठकीत “सिंधुदुर्ग रिन्यूएबल एनर्जी असोसिएशन” ची अधिकृत…

Read Full News

भरवस्तीत डुक्कर व्यवसायामुळे निरवडे ग्रामस्थ त्रस्त…

पालकमंत्र्यांचे लक्ष वेधणार: संजू परब यांचा इशारा.. सावंतवाडी : निरवडे गावात भरवस्तीत डुक्कर व्यवसाय केला जात असून याचा येथील ग्रामस्थांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. व्यायसाय कुणीही करावा पण इतरांना त्रास होता कामा नये याचीही दक्षता घ्यायला हवी. ग्रामस्थांनी गेले ६ महिने आरोग्य विभागाकडे तक्रार करूनही कोणतीही दखल घेतली गेली नाही. आज हे ग्रामस्थ…

Read Full News

You cannot copy content of this page