⚡मालवण ता.२१-:
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सोलर क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यावसायिकांच्या सिंधुदुर्ग रिन्यूएबल एनर्जी असोसिएशनच्या अध्यक्षपदी श्री. आशिष कोरगावकर यांची तर सचिवपदी श्री. किशोर दाभोलकर यांची तसेच खजिनदारपदी श्री. बाळकृष्ण सावंत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे
जिल्ह्यातील सोलर क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यावसायिकांची कुडाळ येथे बैठक संपन्न झाली या बैठकीत “सिंधुदुर्ग रिन्यूएबल एनर्जी असोसिएशन” ची अधिकृत स्थापना करण्यात आली
या बैठकीस श्री. प्रवीण सावंत, श्री. श्रीपाद खोबरेकर, श्री. लतेश चोपडेकर, श्री. सिद्धेश मोबारकर, श्री. विशाल साटम तसेच श्री. आशुतोष पाटील यांच्यासह जिल्ह्यातील विविध भागांतून आलेले सोलर व्यावसायिक उपस्थित होते.
बैठकीदरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात रिन्यूएबल एनर्जी क्षेत्राचा शाश्वत व सर्वांगीण विकास साधणे, सोलर व्यावसायिकांमध्ये समन्वय व सहकार्य वाढविणे, तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध ऊर्जा योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी संघटित पद्धतीने कार्य करण्याचा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला. शेवटी खजिनदार श्री. बाळकृष्ण सावंत यांनी उपस्थितांचे आभार मानले.
