मालवणचे उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांची कर्तव्य दक्षता…

मालवण नळपाणी योजनेचे अपव्यय होणारे पाणी बंद करण्यासाठी केली गेटव्हॉल्वची दुरुस्ती..

⚡मालवण ता.२१-: धामापूर पाणीपुरवठा योजनेच्या कुंभारमाठ येथील पाणी साठवणूक करणाऱ्या टाकीजवळील मुख्यवाहिनीवरील आणि मालवण शहरातील उपवाहिन्यांवरील तीस वर्षांपूर्वी बसविण्यात आलेले पाण्याचे गेटव्हॉल्व खराब झाल्याने पाण्याचा होणारा अपव्यय निदर्शनास येताच मालवणचे उपगराध्यक्ष आणि पाणीपुरवठा समितीचे सभापती दिपक पाटकर यांनी पुढाकार घेत खराब झालेल्या नळपाणी योजनेच्या गेटव्हॉल्वच्या दुरुस्तीचे काम ठेकेदाराकडून हाती घेण्यात आले आहे या दुरुस्तीच्या कामाचा शुभारंभ मालवण देऊळवाडा आडारी रोडवरील गेटव्हॉल्व दुरुस्तीचे काम उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांनी स्व:खर्चातून केले असून मालवण शहरातील अन्य सहा ठिकाणच्या गेटव्हॉल्वच्या दुरुस्ती लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती श्री दीपक पाटकर यांनी दिली आहे श्री पाटकर यांनी विकासकामाच्या बाबतीत घेतलेला पुढाकार आणि औदर्य याबाबत नागरिकांत समाधान व्यक्त करण्यात येत आहे

मालवण नगरपालिकेच्या धामापूर योजनेच्या पाईपलाईनवर मालवण शहरात विविध ठिकाणी गेटव्हॉल्व बसविण्यात आले आहेत. हे गेटव्हॉल्व सुमारे ३० वर्षे जुने असल्याने ते नादुरुस्त होऊन अनेकवेळा पाणीपुरवठ्यामध्ये अडचणी निर्माण होण्याच्या घटना घडल्या होत्या. ही समस्या दूर करण्यासाठी उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांनी हे गेटव्हॉल्व दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. त्यानुसार सदर योजनेचे ठेकेदार श्री. नाईक यांना शहरातील खराब झालेले गेटव्हॉल्व प्रत्यक्ष दाखविण्यात आले. त्यानंतर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. आडारी रोड भागातील देसाई कुटुंबियांच्या घरानजीक असलेल्या गेटव्हॉल्वच्या दुरुस्तीचे काम जेसीबी आणि नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्याच्या साहाय्याने श्री पाटकर यांनी स्व:खर्चातून केल्याने होणारा पाण्याचा अपव्यय बंद होणार असून पाणी पुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे श्री पाटकर यांनी कामाबद्दल दाखविलेल्या कर्तव्य दक्षते बाबत नागरिकांनी समाधान व्यक्त करत श्री. पाटकर व नगरपालिका प्रशासनाचे आभार मानले आहेत .

दरम्यान, मालवण शहरातील बांगी वाडा नाक्यावरील धुरीवाडा, कोतेवाडा, रेवतळे उपवाहिनीवरील गेटव्हॉल्व, बांगीवाडा नाक्यावरील राजकोट, कचेरीरोड, मेढा, न. प. वसाहत उपवाहिनीवरील जुना खराब गेटव्हाल्व, रेवतळे येथील श्री. पटकारे घराजवळील उपवाहिनीवरील गेटव्हॉल्व, भरड दत्तमंदिर नजीक बाजारपेठ येथील उपवाहिनीवरील गेटव्हॉल्व, कुंभारमाठ GSR टाकीचा मुख्य – वाहिनीवरील जुना खराब झालेला गेटव्हाल्व, देऊळवाडा येथील बाळू आकेरकर घरासमोरील उपवाहिनीवरील जुना खराब गेटव्हाल्व आदी गेटव्हॉल्व दुरुस्त करण्यात येणार असल्याची माहिती मालवणचे उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांनी दिली

You cannot copy content of this page