राज्यस्तरीय गुरुकुल स्पर्धा परीक्षेत घारपी शाळेची चमकदार कामगिरी…

⚡बांदा ता.२१-: राज्यस्तरीय गुरुकुल स्पर्धा परीक्षेत घारपी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी शंभर टक्के निकालाची अभिमानास्पद कामगिरी करत शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे.
गुरूकुल एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर यांच्या वतीने जानेवारी २०२६मध्ये घेण्यात आलेल्या या राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत इयत्ता पहिलीतील किर्ती राजेंद्र गावकर हिने उल्लेखनीय यश संपादन करत जिल्ह्यात आठवा क्रमांक तसेच राज्यात तेरावा क्रमांक पटकावला आहे. तिच्या या यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. तसेच मानस महेश नाईक याने तालुकास्तरावर तृतीय क्रमांक प्राप्त केला.
याचसोबतच पहिलीतील यज्ञा संतोष कविटकर, पाचवीतील बळीराम सहदेव गावडे आणि सातवीतील भिकाजी उमेश नाईक या विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवत शाळेच्या यशात भर घातली आहे.
या विद्यार्थ्यांना प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. जे. डी. पाटील, वर्गशिक्षक आशिष तांदुळे, मुरलीधर उमरे व धर्मराज खंडागळे यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र गावकर, उपाध्यक्ष यशोदा गावडे, शिक्षणप्रेमी विजय गावकर, स्थानिक प्राधिकरण सदस्य आनंद गावडे तसेच ग्रामस्थांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

You cannot copy content of this page