Headlines

Global Maharashtra Breaking News

रुग्ण संख्या वाढत असल्याने नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक

*जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान अध्यक्ष राजू मसुरकर यांचे आवाहन *💫सावंतवाडी दि.१०-:* सिंधुदुर्गातील नागरिकांनी आता कोरोना महामारी चा संसर्ग दिवसेंदिवस जिल्ह्यात शहरातआपल्या गावागावांमध्ये रुग्णसंख्या वाढत चालल्याने खबरदारी घेणे आवश्यक आहे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी केले आहे. यामुळे शासनाला वेळोवेळी लॉकडाऊन करून कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी उपायोजना नाईलाजाने कराव्या लागतात याला…

Read Full News

माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बोर्ड कामकाजासाठी कार्यमुक्त करावे…

माध्यमिक शिक्षक भारती संघटनेचे दोडामार्ग तहसीलदारांना निवेदन. *💫दोडामार्ग दि.१०-:* कोविड 19 च्या आजाराच्या अनुषंगाने दोडामार्ग तालुक्यातील माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या चेक पोस्ट,कोविड सेंटर, प्राथमिक आरोग्य केंद्र, लसीकरण व विलगीकरण इ. ठिकाणी नियुक्ती करण्यात आले आहेत. गेले अनेक दिवस कर्मचारी सुट्टी कालावधीत आपत्ती व्यवस्थापन राष्ट्रीय कर्तव्य म्हणून प्रामाणिकपणे सेवा बजावत आहेत. दिनांक 28 मे 2021…

Read Full News

राष्ट्रवादीचा २२ वा वर्धापन दिन

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात फळ वाटप कोरोनामुळे वाढदिनी साधेपणी:प्रवीण भोसले *💫सावंतवाडी-:* राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस तर्फे कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी आज सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात फळ वाटप केले आहे. यावेळी बोलताना माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले म्हणाले की, कोरोना मुळे यावर्षी साध्या पद्धतीने हा वर्धापन दिन साजरा करत आहोत. यावर्षी कोरोना आजारावर उपचार घेणाऱ्या…

Read Full News

मैत्रेय महिला ट्रस्टच्यावतीने खारेपाटण य कोविड सेंटरला २ कॉन्स्ट्रेटर भेट..

*💫कणकवली दि.१०-:* खारेपाटण येथे लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या व नुकतेच सुरु करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटर करिता मैत्रेय महिला ट्रस्ट खारेपाटण या सामाजिक संस्थेच्यावतीने २ कॉन्स्ट्रेटर मशीन भेट स्वरूपात देण्यात आल्या. खारेपाटण गावचे सरपंच रमाकांत राऊत यांच्या प्रयत्नातून टाटा हॉस्पिटल मुंबई च्या डॉ.बछेरा मॅडम व रोटरी क्लब बॉम्बे असोसिएट तसेच एनजीओ सेल मुंबई बीजेपी यांच्या सौज्यन्याने…

Read Full News

चार दिवसात खुन्याचा शोध

भाजपने केले बांदा व एलसीबी पोलिसांचे अभिनंदन *💫बांदा दि.१०-:* बांदा येथे काही दिवसापूर्वी एका परप्रांतीय कामगाराचा खून करून फरार झालेल्या आरोपीचा बांदा पोलिसांनी ४ दिवसात शोध घेऊन त्याला अटक केल्याने भाजप तर्फे बांदा पोलिस निरीक्षक जाधव आणि ओरोस येथील एल सी पी पथकाचे पुष्पगुच्छ देवून सत्कार केला आहे.

Read Full News

माझी वसुंधरा अभियानात महाराष्ट्रात अव्वलस्थानी

माझी वसुंधरा अभियानात महाराष्ट्रात अव्वलस्थानी *💫कणकवली दि.१०-:* कणकवली नगरपंचायतीने आपल्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला असून माझी वसुंधरा अभियान 2020 – 21 मध्ये महाराष्ट्र राज्यात कणकवली नगरपंचायतने अव्वल स्थान मिळवले आहे. राज्यभरातील 132 नगरपंचायतीनी या अभियानात सहभाग घेतला होता.कणकवली नगरपंचायत 38 व्या क्रमांकावर आपली छाप उमटवली आहे. या अभियानात भूमि, वायू, जल, अग्नी व आकाश या…

Read Full News

डॉ. अबिदा परब आणि डॉ. विवेक रेडकर यांच्या कोरोना उपचार पद्धतींना मान्यता द्यावी

विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटना, युवा रक्तदाता संघटनेची निवेदनातून मागणी* *💫सावंतवाडी दि.१०-:* कोरोनाला रोखण्यासाठी सावंतवाडीच्या डॉ.अबिदा परब आणि मालवणचे डॉ.विवेक रेडकर यांनी आपल्या स्तरावर उपलब्ध संसाधनांचा वापर करत वेगवेगळ्या उपचार पद्धती शोधून काढल्या आहेत, त्यांना लवकरात लवकर मान्यता देण्यात यावी, अशी मागणी माजी शिक्षण आरोग्य सभापती तथा श्री विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्री मंगेश तळवणेकर…

Read Full News

गोरगरिबांचा कैवारी , अनाथांचा नाथ व सच्चा

कोरोनायोद्धा माजी नगराध्यक्ष संतोष नांनचे वाढदिवस विशेष *💫दोडामार्ग दि.१० -:* दोडामार्ग शहरातील एक उत्तम हॉटेल व्यावसायिक आणि उत्कृष्ट क्रिकेटपटू असणारे संतोष नानचे यांना राजकारण आणि समाजकारण याची आवड असल्याने लोकांची सेवा करता यावी या भावनेने त्यानी राजकारणात पाऊल ठेवले होते. त्यांचे कार्य पाहून दोडामार्ग ग्रामपंचायतीत २०१२ साली झालेल्या निवडणुकीत त्यांना संधी देण्यात आली होती. आणि…

Read Full News

नांदोस गावात जीवनावश्यक वस्तुचे वाटप

युवासेना उपजिल्हा प्रमुख पंकज वर्दम यांचा पुढाकार;गाव लॉकडाऊन असल्याने नागरिकांची झाली होती हालत मालवण दि प्रतिनिधी वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे काही गावात व्यापाऱ्यांनी आपली दुकाने उत्स्फूर्त बंद ठेवल्याने जीवनावश्यक वस्तूं मिळणे कठीण बनत आहेत नांदोस गावातही काहीशी अशीच परिस्थिती असल्याने रुग्णांच्या मदतीसाठी शिवसेनेचे शिलेदार आणि युवासेना उपजिल्हाप्रमुख पंकज वर्दम यांनी या गावात धाव घेत काही…

Read Full News

9 ते 13 जून कालावधीत जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

सर्व विभाग प्रमुखांनी आपल्या अधिनस्त यंत्रणांना सतर्क करावे सार्वजनिक बांधकाम विभाग, महामार्ग प्राधिकरणाने पथके तैनात ठेवावीत;जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी *💫सिंधुदुर्गनगरी दि.०९-:* भारतीय हवामान खात्यामार्फत 9 जून ते 13 जून या कालावधीत जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सर्व विभागांची दूरदृष्यप्रणालीद्वारे जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी बैठक घेत आपल्या अधिनस्त यंत्रणेला सतर्क राहण्याची सूचना…

Read Full News

You cannot copy content of this page