माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बोर्ड कामकाजासाठी कार्यमुक्त करावे…

माध्यमिक शिक्षक भारती संघटनेचे दोडामार्ग तहसीलदारांना निवेदन.

*💫दोडामार्ग दि.१०-:* कोविड 19 च्या आजाराच्या अनुषंगाने दोडामार्ग तालुक्यातील माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या चेक पोस्ट,कोविड सेंटर, प्राथमिक आरोग्य केंद्र, लसीकरण व विलगीकरण इ. ठिकाणी नियुक्ती करण्यात आले आहेत. गेले अनेक दिवस कर्मचारी सुट्टी कालावधीत आपत्ती व्यवस्थापन राष्ट्रीय कर्तव्य म्हणून प्रामाणिकपणे सेवा बजावत आहेत. दिनांक 28 मे 2021 च्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णयाने शैक्षणिक वर्ष 20 21 साठी दहावी बोर्ड परीक्षेची अंतर्गत मूल्यमापन प्रक्रिया सुरू झाली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या दिनांक 9 जून 2021 च्या परिपत्रकानुसार मूल्यमापन प्रक्रिया दिनांक 10 जून 2021 ते दि.30 जून 2021 या कालावधीत पूर्ण करणे बंधनकारक आहे. तसेच नवीन शैक्षणिक वर्ष 14 जून 2021 पासून सुरू होणार असून *विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण व इतर शालेय कामकाजासाठी* माध्यमिक कर्मचाऱ्यांना कोविड ड्युटीतून कार्यमुक्त करावे. त्याचबरोबर covid-19 च्या अनुषंगाने पुढील नेमणुकीतून सूट देण्यात यावी असे निवेदन शिक्षक भरती सिंधुदुर्ग शाखा दोडामार्ग च्या वतीने माननीय तहसीलदार तथा गटशिक्षणाधिकारी दोडामार्ग यांना देण्यात आले यावेळी पतपेढी संचालक ,जिल्हा संघटक समीर परब,दोडामार्ग तालुका शिक्षक भारती अध्यक्ष शरद देसाई, सचिव श्रीनिवास शिंगे,कृष्णा नाईक, सतीश धर्णे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page