मैत्रेय महिला ट्रस्टच्यावतीने खारेपाटण य कोविड सेंटरला २ कॉन्स्ट्रेटर भेट..

*💫कणकवली दि.१०-:* खारेपाटण येथे लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या व नुकतेच सुरु करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटर करिता मैत्रेय महिला ट्रस्ट खारेपाटण या सामाजिक संस्थेच्यावतीने २ कॉन्स्ट्रेटर मशीन भेट स्वरूपात देण्यात आल्या. खारेपाटण गावचे सरपंच रमाकांत राऊत यांच्या प्रयत्नातून टाटा हॉस्पिटल मुंबई च्या डॉ.बछेरा मॅडम व रोटरी क्लब बॉम्बे असोसिएट तसेच एनजीओ सेल मुंबई बीजेपी यांच्या सौज्यन्याने कोरोना बाधित रुग्णांच्या सेवेसाठी २ कॉन्स्ट्रेटर येथील कोविड सेंटरला देण्यात आले आहे. यावेळी खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते रफिक नाईक,महेश कोळसुलकर, संकेत शेट्ये,रुपेश सावंत,ऋषी राऊत,सिंधुदुर्ग जिल्हा डॉक्टर फेडरेशनचे अध्यक्ष डॉ.पाताडे, मंडल अधिकारी मंगेश यादव,खारेपाटण उपसरपंच इस्माईल मुकादम,माजी सरपंच संदेश धुमाळे,ग्रामपंचयत सदस्या उज्वला चिके,परवेज पटेल,प्रशांत गाठे,डॉ.प्रसाद मालंडकर,डॉ भाग्यश्री बोडके,डॉ.सुजित कदम आदी मान्यवर पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. खारेपाटण कोविड सेंटर मध्ये सध्या १० कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत असून खारेपाटण येथील कोविड सेंटर करीता मैत्रेय महिला ट्रस्टच्या वतीने २ कॉन्स्ट्रेटर मशीन भेट दिल्याबद्दल ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

You cannot copy content of this page