Headlines

Global Maharashtra Breaking News

भाजपा च्या वतीने माझा – वेंगुर्ला या संस्थेस दोन ऑक्सिजन काॅन्सस्ट्रेटर भेट…

जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची उपस्थिती *💫वेंगुर्ला दि.१०-:* वेंगुर्ले तालुक्यातील माझा – वेंगुर्ला ही संस्था कोवीड काळात करत असलेल्या कार्याने प्रभावित होऊन भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी माझा – वेंगुर्ला या संस्थेस दोन ऑक्सिजन काॅन्सस्ट्रेटर भेट दिले. यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष राजन तेली म्हणाले की शासनाची आरोग्य यंत्रणा ही मनुष्यबळ अभावी कोलमडलेली आहे. परंतु त्यामधुन सावरण्यासाठी माझा…

Read Full News

कासार्डे धुमाळवाडी येथे 55 कुटुंबाना धान्य वाटप

कणकवली प.स.उपसभापती प्रकाश पारकर यांची सामाजिक बांधिलकी *💫कणकवली दि.१०-:* कणकवली पंचायत समिती उपसभापती तथा सुप्रसिद्ध भजनसम्राट प्रकाश पारकर यांच्यावतीने कासार्डे धुमाळवाडी येथे 55 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या कुटुंबाना सामाजिक बांधीलकी या माध्यमातून धान्य वाटप करण्यात आले .या निमित्ताने उपसभापती प्रकाश पारकर यांनी सामाजिक बांधिलकीचे उदाहरण दिले आहे. प्रकाश पारकर हे गेली अनेक वर्ष समाजाशी नाळ जुळवून…

Read Full News

गोळवण आरोग्य केंद्राला लवकरात लवकर रुग्णवाहीका द्या…

आमदार वैभव नाईक यांच्याकडे गोळवण ग्रामस्थांची निवेदनाद्वारे मागणी;पालकमंत्री यांच्या सहकार्यातून रुग्णवाहिका देण्याचे दिले आश्वासन *💫मालवण दि.१०-:* गोळवण आरोग्य केंद्राला लवकरात लवकर रुग्णवाहीका द्या, अशी मागणी आमदार वैभव नाईक यांच्याकडे गोळवण ग्रामस्थांनी निवेदनातून केली आहे. निवेदनात म्हटले की, गोळवण आरोग्य केंद्राच्या कक्षेत गोळवण, डिकवल, नांदोस, सुकळवाड, वराड, पेंड्रर, कुणकावळे, कुमामे, तिरवडे, तळगाव अशी मोठी गावे येतात….

Read Full News

परिवर्तन दशावतारांचे या नवीन संकल्पनेचे अभिनेते दिगंबर नाईक यांच्याकडून उद्घाटन

*💫सावंतवाडी दि.१०-:* कोरोना काळात हतबल झालेला दशावतारी राजा ” आता कातटाकतोय ” कोविड 19 या महामारीमुळे बरेच कला प्रकार आणि कलाकार आज रंगमंचापासून दूर जाताना पहायला भेटतेय . त्यातच आपल्या कोकणचा श्वास असलेला “दशावतार ” हा कला प्रकार जत्रा, वार्षिक उत्सव बंद करण्यात आल्यामुळे आपल्यासमोर सादर होऊ शकत नाही. त्यामुळे जसा प्रेक्षकवर्ग या कलाकाराला बघायला…

Read Full News

सिंधुदुर्गात आरोग्याची स्थिती गंभीर मात्र सत्ताधारी उदासीन

राजन तेली:शासनाविरोधात भाजपचे उद्या जिल्हा रूग्णालयासमोर लक्षवेध आंदोलन *💫कणकवली दि.१०-:* कोरोनावर नियंत्रण आणण्यात सत्ताधारी व प्रशासनाला अपयश आले आहे.सिंधुदुर्गातील आरोग्य परिस्थिती गंभीर झाली आहे. आतापर्यंत ८०३ बळी गेलेत. तर दररोज अनेकांचा कोरोनामुळे बळी जात आहे. मात्र पालकमंत्री झोपले आहेत.जिल्ह्यात चांगले डॉक्टर्स, औषध पुरवठा दिले जात नाहीत. भारतीय जनता पार्टीने गेले काही महिने प्रशासन व सत्ताधाऱ्यांना…

Read Full News

दारू वाहतूक प्रकरणातील आरोपीला जामीन

*💫सावंतवाडी दि.१०-:* गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या ४ आरोपींची पोलिस कोठडी संपल्यानंतर त्यांना ४ जुन रोजी सावंतवाडी. न्यायालयात हजर केले असता. न्यायलयाने त्यांनां न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यावेळी न्यायलयाने आरोपी ओम प्रकाश बाबुलाल पाल यास १५ हजाराचा जामिनावर मुक्तता केली आहे. याकामी अँड परशुराम चव्हाण यांनी काम पाहिले. याबाबत अधिक माहिती…

Read Full News

कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण अंतर्गत तक्रार निवारण समिती गठित करणे बंधनकारक

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विनीत म्हात्रे *💫सिंधुदुर्गनगरी दि.१०-:* कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून सुरक्षा (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम 2013 च्या कलम 4(1) अंतर्गत कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी अंतर्गत तक्रार निवारण समिती गठित करणे बंधनकारक आहे. अशा प्रकारची समिती स्थापन करून सर्व शासकीय, निमशासकीय, अनुदानीत तसेच खाजगी कार्यालये यांनी…

Read Full News

कोणत्याही आर्थिक भूलथापांना बळी न पडता संपर्क साधून खात्री करावी

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विनीत म्हात्रे *💫सिंधुदुर्गनगरी दि.१०-:* कोरोना कालावधीत दोन्ही पालक गमावलेल्या अनाथ बालकांच्या बाबतीत व्हॉट्स ॲप तसेच अन्य प्रसार माध्यमांमार्फत प्रसिद्ध होणाऱ्या कोणत्याही आर्थिक भूलथापांना बळी पडू नेये. याबाबत कोणतेही मार्गदर्शन अथवा मदत अपेक्षित असल्यास जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय – 02362- 228869 वर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा…

Read Full News

डेअरी कॉलेजचे प्राचार्य प्रसाद सावंत यांना पितृशोक…

*💫कणकवली दि.१०-:* कणकवली तालुक्यातील शिवडाव – ओटोसवाडी येथील रहिवाशी शासकीय डेअरीतील सेवानिवृत्त कर्मचारी लक्ष्मण अनाजी सावंत ( 79 ) यांचे गुरुवारी सकाळी हृदय विकाराने निधन झाले आप्त स्वकी्यांमध्ये ते दादा पटेल म्हणून परिचित होते. दादा पटेल यांना सकाळी हृदय विकाराचा त्रास जाणवू लागला अन काहीवेळातच त्यांची प्राणजोत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक विवाहित…

Read Full News

मालवण तालुक्यात सर्वाधिक 95 मि.मी. पाऊस…

*💫सिंधुदुर्गनगरी, दि.१०-:* जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात मालवण तालुक्यात सर्वाधिक 95 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 50 पूर्णांक 275 मि.मी पावसाची नोंद झाली झाली आहे. 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 177.75 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत….

Read Full News

You cannot copy content of this page