गोळवण आरोग्य केंद्राला लवकरात लवकर रुग्णवाहीका द्या…

आमदार वैभव नाईक यांच्याकडे गोळवण ग्रामस्थांची निवेदनाद्वारे मागणी;पालकमंत्री यांच्या सहकार्यातून रुग्णवाहिका देण्याचे दिले आश्वासन

*💫मालवण दि.१०-:* गोळवण आरोग्य केंद्राला लवकरात लवकर रुग्णवाहीका द्या, अशी मागणी आमदार वैभव नाईक यांच्याकडे गोळवण ग्रामस्थांनी निवेदनातून केली आहे. निवेदनात म्हटले की, गोळवण आरोग्य केंद्राच्या कक्षेत गोळवण, डिकवल, नांदोस, सुकळवाड, वराड, पेंड्रर, कुणकावळे, कुमामे, तिरवडे, तळगाव अशी मोठी गावे येतात. सद्यस्थितीत गोळवण आरोग्य केंदाची रुग्णवाहिका नादुरुस्त आहे. त्यामुळे कोरोना काळात लोकांची पंचाईत होते, त्यामुळे या गावातील लोकांनी एकत्र येत आमदार वैभव नाईक यांच्याकडे रुग्णवाहीकेसाठी मागणी केली. कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची ने-आण करण्यासाठी रुग्णवाहिकेची मोठ्या प्रमाणात गरज आहे. अशावेळी लोकांची अडचण जाणून घेऊन आमदार वैभव नाईक यानी पालकमंत्री यांच्या सहकार्यातून रुग्णवाहिका देण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी गोळवणचे माजी सरपंच प्रज्ञा चव्हाण, शाखाप्रमुख सुभाष सामंत, नाथा चव्हाण, महिला शाखाप्रमुख प्राजक्ता परब, मंगल चिरमुले, उपशाखाप्रमुख धनाजी चिरमुले, हेमंत परब, युवा सेनेचे आनंद मिरमुले, विराज गावडे, दत्ताराम गावडे, भालचंद गावडे, गंगाराम गावडे, एम. जी. गावडे, संदीप नाईक, वासुदेव पावसकर व ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page