*💫सावंतवाडी दि.१०-:* कोरोना काळात हतबल झालेला दशावतारी राजा ” आता कातटाकतोय ” कोविड 19 या महामारीमुळे बरेच कला प्रकार आणि कलाकार आज रंगमंचापासून दूर जाताना पहायला भेटतेय . त्यातच आपल्या कोकणचा श्वास असलेला “दशावतार ” हा कला प्रकार जत्रा, वार्षिक उत्सव बंद करण्यात आल्यामुळे आपल्यासमोर सादर होऊ शकत नाही. त्यामुळे जसा प्रेक्षकवर्ग या कलाकाराला बघायला आतुरला त्या पेक्षा हा कलाकार आपल्यासमोर यायला आतुरला आहे. म्हणुनच या दशावतारी राजाने आता कात टाकलीय. ” दशावतार कलेचे आम्ही पूजक या यु ट्युब चॅनेलद्वारे “परिवर्तन दशावताराचे” हा नविन प्लॅटफॉर्म घेउन आपला हा कलाप्रकार परत दिसणार. या स्तुत्य उपक्रमाला 7 जुन पासून सुरूवात झाली. या स्तुत्य उपक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध सिनेअभिनेते मालवणी सम्राट श्री दिगंबर नाईक यांच्याकडून ऑनलाईन पद्धतीने झाले. कोकणच्या या कलेवर प्रेम करणारे नाईक यानी या उपक्रमाविषयी बोलताना सांगितल की दशावतार कलाकार हा कोरोना काळात संकटात सापडला आहे. संसाराचा कणा असणारा हा कलाकार किती दिवस कोणाकडे हात पसरणार? म्हणूनच स्वतःला जत्रेपुरत आणि कोकणापुरत मर्यादित न ठेवता संपूर्ण जगाशी या कलेची ओळख करण्यासाठी हा कलाकार स्वतःच्या चॅनलवर म्हणजे ओ.टी.टी प्लॅटफॉर्म वर येतोय. तेंव्हा “दशावतार कलेचे आम्ही पूजक ” या कलाकारांच्या हक्काच्या चॅनलला आजच सबस्क्रिप्शन करुन तसेच जॉईन होउन तुम्हास या 30 संयुक्त दशावतार नाटकाचे प्रेक्षक होण्याचे आवाहन नाईक यांच्याकडून करण्यात आले. या उपक्रमात त्रिमुर्ती षडानन_अष्टभुजाधारी* असा खजिना आहे. 3 नाटक_60 रू (त्रिमुर्ती) 6 नाटक_119रू (षडानन) 8 नाटक _159रू (अष्टभुजाधारी ) खर्च करूनच पहायला भेटणार. म्हणजेच एक नाटक 20 रू खर्च करून बघावे लागेल जे कठीण नाही. तेंव्हा संसाराचा कणा असणाऱ्या आपल्या कोकणच्या कलाकाराला हातभार लागेलच त्या बरोबर या कलेचे आराध्य दैवत गणरायाची सेवा घडेल. तेंव्हा बहुसंख्येने या चॅनल ला जॉईन होउन आजच सहभागी व्हा “परिवर्तन दशावताराचे” या उपक्रमात.
परिवर्तन दशावतारांचे या नवीन संकल्पनेचे अभिनेते दिगंबर नाईक यांच्याकडून उद्घाटन
