सिंधुदुर्गात आरोग्याची स्थिती गंभीर मात्र सत्ताधारी उदासीन

राजन तेली:शासनाविरोधात भाजपचे उद्या जिल्हा रूग्णालयासमोर लक्षवेध आंदोलन

*💫कणकवली दि.१०-:* कोरोनावर नियंत्रण आणण्यात सत्ताधारी व प्रशासनाला अपयश आले आहे.सिंधुदुर्गातील आरोग्य परिस्थिती गंभीर झाली आहे. आतापर्यंत ८०३ बळी गेलेत. तर दररोज अनेकांचा कोरोनामुळे बळी जात आहे. मात्र पालकमंत्री झोपले आहेत.जिल्ह्यात चांगले डॉक्टर्स, औषध पुरवठा दिले जात नाहीत. भारतीय जनता पार्टीने गेले काही महिने प्रशासन व सत्ताधाऱ्यांना सहकार्य म्हणून शांत राहण्याची भूमिका घेत आम्ही गप्प बसलो होतो. मात्र आता शासनाला जाग आणण्यासाठी भाजपतर्फे शुक्रवार 11 जून रोजी जिल्हा रूग्णालयासमोर लक्षवेध अभियान आंदोलन केले जाणार आहे. त्यानंतर प्रत्येक तालुका, गाव पातळी देखील हे आंदोलन सुरू केले जाणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज दिली. भाजपा जिल्हा अध्यक्ष राजन तेली यांनी झुम अ‍ॅपच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले,सिंधुदुर्गात दोन वेळा मुख्यमंत्री येऊन देखील उपयोग झालेला नाही.शासन सिंधुदुर्गच्या आरोग्य यंत्रणेकडे अक्षम्य दुर्लक्ष आहे.शासन कोरोनाबाबतची आकडेवारी लपवत आहे. आरटीपीसीआरच्या होणार्‍या टेस्ट पाहता जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट २२ टक्के पेक्षा जास्त आहे. त्यामुळे प्रशासनाने सरसकट कोरोना तपासणी बंद करावी. आवश्यकतेनुसार आर्टिपीसीआर तपासणी केली पाहिजे.जिल्ह्यातील वस्तुस्थिती मुख्यमंत्र्यांपर्यंत प्रशासनाने पोचवली पाहिजे.ती पोहोचत नसल्यामुळे भारतीय जनता पार्टी उद्यापासून रस्त्यावर उतरत आहे. जिल्ह्यात डॉक्टर आणि इतर वैद्यकिय क्षेत्रातील ६०० पेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. जिल्हा रूग्णालयात एकही फिजिशियन नाही. अशी परिस्थिती असेल तर रूग्णांवर चांगले उपचार कसे होणार? ही बाब शासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी लक्षवेध अभियान आंदोलन करणार आहोत. राजन तेली म्हणाले, सिंधुदुर्गात आरोग्याची परिस्थिती गंभीर आहे, दुसरीकडे सत्ताधारी सावंतवाडीचे आमदार व्हिडिओ बैठका घेण्यातच मग्न आहेत. सिंधुदुर्गची संपूर्ण आरोग्य यंत्रणा फेल्यूअर झाली आहे. होतो.गेल्या दोन महिन्यापासून बंद ठेवून व्यापारी आणि सर्वसामान्य लोकांचे नुकसान करण्यात आले. मात्र कोरोनावर नियंत्रण आणण्यात सत्ताधारी व प्रशासनाला अपयश आले आहे.आरोग्यमंत्री झोपले आहेत. मात्र सिंधुदुर्गातील जनतेचे प्राण वाचवायचे असतील तर सर्वांनी एकत्रित येऊन काम करायला हवं. आम्ही आमचं सहकार्य द्यायला तयार आहोत. पण सत्ताधारी आम्हा विरोधकांना विश्‍वासातच घेत नाही. सध्या सिंधुदुर्गातील आरोग्य यंत्रणा हतबल आहे. त्यामुळे ज्या जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालाय. तेथील तज्ज्ञ डॉक्टर सिंधुदुर्गात आणायला हवेत. एकीकडे जिल्हा नियोजन मधून ५७ कोटीचा निधी कोरोनासाठी वापरण्यात आला. ठाकरे सरकार म्हणते निधी कमी पडू देणार नाही, मग रुग्णांच्या नातेवाईकांना चिठ्ठ्या लिहून देत आर्थिक भुर्दंड का पाडला जातो?असा सवाल राजन तेली यांनी केला.मुंबई,ठाणे, पुणे या मेट्रो सिटी मधील कोरोना बधितांची संख्या कमी झालेली आहे. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात अद्यापही रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही.प्रत्येक गोष्टी मध्ये पालकमंत्री उदय सामंत व त्यांचे सहकारी राजकारण करत आहे.रुग्णवाहिका उद्घाटन करण्यासाठी ८ दिवस उभ्या ठेवल्या, ज्या पद्धतीने कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू होतो आहे, त्यामुळे उपचार पद्धतीवर शंका निर्माण झालेली आहे. जिल्ह्यात लसीकरणासाठी जास्त लसीचा पुरवठा व्हायला हवा या सर्वांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही भाजपचे सर्व पदाधिकारी लक्षवेध अभियान आंदोलन करणार आहोत. याची सुरवात उद्या जिल्हा रूग्णालयाबाहेर होणार आहे. त्यानंतर प्रत्येक उपजिल्हा रूग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र येथेही भाजपचे पदाधिकारी लक्षवेध आंदोलन करणार आहोत.

You cannot copy content of this page