दारू वाहतूक प्रकरणातील आरोपीला जामीन

*💫सावंतवाडी दि.१०-:* गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या ४ आरोपींची पोलिस कोठडी संपल्यानंतर त्यांना ४ जुन रोजी सावंतवाडी. न्यायालयात हजर केले असता. न्यायलयाने त्यांनां न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यावेळी न्यायलयाने आरोपी ओम प्रकाश बाबुलाल पाल यास १५ हजाराचा जामिनावर मुक्तता केली आहे. याकामी अँड परशुराम चव्हाण यांनी काम पाहिले. याबाबत अधिक माहिती अशी की, १ जुन रोजी करण्यात आलेल्या कारवाईत गोवा बनावटीच्या दारुसह ट्रक धरून एकूण ८० लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. यावेळी रोशन ओम प्रकाश पाल, ओम प्रकाश बाबुलाल पाल, दिलीप कमल रावत, रुपेश पांढरे सोने सर्व राहणार मध्य प्रदेश यांना अटक करण्यात आली होती.

You cannot copy content of this page