भाजपा च्या वतीने माझा – वेंगुर्ला या संस्थेस दोन ऑक्सिजन काॅन्सस्ट्रेटर भेट…

जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची उपस्थिती

*💫वेंगुर्ला दि.१०-:* वेंगुर्ले तालुक्यातील माझा – वेंगुर्ला ही संस्था कोवीड काळात करत असलेल्या कार्याने प्रभावित होऊन भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी माझा – वेंगुर्ला या संस्थेस दोन ऑक्सिजन काॅन्सस्ट्रेटर भेट दिले. यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष राजन तेली म्हणाले की शासनाची आरोग्य यंत्रणा ही मनुष्यबळ अभावी कोलमडलेली आहे. परंतु त्यामधुन सावरण्यासाठी माझा – वेंगुर्ला ही संस्था आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी मदत करत आहे. वेंगुर्ले तालुक्याच्या मुलभुत आरोग्य सुविधेला बळकट करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या ” आम्ही वेंगुर्लेकर सक्षम अभियान” ला पण राजन तेली यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी माझा – वेंगुर्ला या संस्थेचे सदस्य नगरसेवक प्रशांत आपटे यांनी आगामी काळात घेण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली व आॅक्सीजन काॅन्सस्ट्रेटर संस्थेस भेट दिल्याबद्दल जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचे आभार मानले.यावेळी या कार्यक्रमाला नगराध्यक्ष राजन गिरप, भाजपा प्रदेश कार्य.सदस्य शरदजी चव्हाण, जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , माझा – वेंगुर्ला चे अध्यक्ष निलेश चेंदवनकर, सचिव – राजन गावडे, शहर अध्यक्ष सुरेंद्र चव्हाण, वसंत तांडेल, मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर, जि.का.का.सदस्य साईप्रसाद नाईक, ता. सरचिटणीस बाबली वायंगणकर, ता.चिटनीस जयंत मोंडकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदिप सावंत, के. जी.गावडे, माझा – वेंगुर्ला चे – अॅड. सूर्यकांत प्रभु खानोलकर, संजय पुनाळेकर, अवधुत नाईक, मोहन होडावडेकर, संदीप परब , अमृत काणेकर , राज पोकळे, प्रथमेश भोगले, यासीर मकानदार, शरद मेस्त्री, निता आंगचेकर, श्रृती गायचोर तसेच माझा – वेंगुर्ला संस्थेचे सदस्य उपस्थित होते.

You cannot copy content of this page