डेअरी कॉलेजचे प्राचार्य प्रसाद सावंत यांना पितृशोक…

*💫कणकवली दि.१०-:* कणकवली तालुक्यातील शिवडाव – ओटोसवाडी येथील रहिवाशी शासकीय डेअरीतील सेवानिवृत्त कर्मचारी लक्ष्मण अनाजी सावंत ( 79 ) यांचे गुरुवारी सकाळी हृदय विकाराने निधन झाले आप्त स्वकी्यांमध्ये ते दादा पटेल म्हणून परिचित होते. दादा पटेल यांना सकाळी हृदय विकाराचा त्रास जाणवू लागला अन काहीवेळातच त्यांची प्राणजोत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक विवाहित मुलगी, सुना, जावई,नातवंडे असा मोठा परिवार आहे कणकवली येथील पशुसवर्धन पदवीका महाविद्यालयाचे ( डेअरी कॉलेज ) प्राचार्य प्रसाद सावंत, न्यास नोंदणी कार्यालयातील ( बिड ) निरीक्षक दत्तराज सावंत, पत्रकार कै .अनिल सावंत यांचे ते वडील होत.

You cannot copy content of this page