Headlines

Global Maharashtra Breaking News

अवकाळी पावसाची झलक; ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था पुन्हा चव्हाट्यावर…

पालकमंत्री नितेश राणेंनी गेल्यावर्षीच दिल्या होत्या रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या सूचना.. ⚡कणकवली ता.२८-: अवकाळी पावसाची झलक सुरू होताच ग्रामीण भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. अवकाळी पावसाचा पहिल्याच सुरुवातीला काही भागांतील खड्डेमय रस्ते पाण्याने भरलेले दिसून आले आहेत. यामुळे ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, काही ठिकाणी येणाऱ्या पावसाळ्यात…

Read Full News

मच्छीमार बांधवांनी विविध समस्यांबाबत वेधले आमदार निलेश राणे यांच लक्ष…

⚡मालवण ता.२७-:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छीमार बांधवांनी मालवण येथे आमदार निलेश राणे यांची भेट घेऊन आपल्या विविध समस्यांबाबत सविस्तर चर्चा केली. मत्स्य व्यवसायासाठी पुरवठा होणाऱ्या डिझेल प्रतिपूर्ती दर वाढीबाबत सिंधुदुर्ग जिल्हा मच्छीमार सहकारी संस्था फेडरेशनमार्फत आमदार निलेश राणे यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान, आपण शासन स्तरावर पाठपुरावा करत असून मंत्री नितेश राणे यांनी केंद्र शासनाला ही याबाबत…

Read Full News

मार्च एंडपूर्वीच सिंधुदुर्गचा विक्रम; २८२ कोटींचा १००% निधी वितरण…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा राज्यात अव्वल;नियोजनबद्ध कामगिरीमुळे विकासकामांना वेग.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.२७-:मार्च अखेर जवळ येत असताना प्रशासनात नेहमीप्रमाणे निधी खर्च आणि वितरणाची मोठी धावपळ सुरू असते. मात्र, यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्याने ही धावपळ यशात परिवर्तित करत संपूर्ण राज्यासमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. जिल्ह्याचा २८२ कोटी रुपयांचा वार्षिक आराखडा १०० टक्के पूर्ण करत, सर्व…

Read Full News

निरवडे येथे आढळली ४ फूट लांब मगर…

वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून मगर जेरबंद ⚡सावंतवाडी ता.२७-: सावंतवाडी रेल्वे स्थानक परिसरातील निरवडे येथील सिल्वर एकर इमारतीच्या तळमजल्यात आज सायंकाळी सुमारे चार फूट लांबीची मगर आढळून आली. थेट मानवी वस्तीत व इमारतीच्या आवारात मगर दिसून आल्याने परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मगरीला पकडून सुरक्षितपणे जेरबंद करत नैसर्गिक अधिवासात सोडले.सिल्वर एकर इमारतीच्या तळमजल्यावरील बंद घराच्या…

Read Full News

शासनाकडून वेंगुर्ला कॅम्प स्टेडियम कायमस्वरूपी ताब्यात घेण्याबाबत ठराव…

श्री. दिलीप गिरप ; मागासवर्गीय कल्याण समिती सभापतीपदी युवराज जाधव यांची निवड.. ⚡वेंगुर्ला ता.२७-: वेंगुर्ला नगरपरिषद कॅम्प येथील स्टेडियम भाडेपट्ट्याने नगर परिषदेच्या ताब्यात घेण्यासंदर्भात आज शुक्रवारी (27मार्च ) सर्वसाधारण सभेत विस्तृत चर्चा झाली. त्यानंतर याबाबतचा पुढील 30 वर्षासाठी भाडेपट्टा करार करण्यासंदर्भात शासनास तातडीने पत्रव्यवहार करण्याचे सर्वानुमते ठरले.वेंगुर्ला नगर परिषदेची सर्वसाधारण सभा आज शुक्रवारी 27 मार्च…

Read Full News

माटणे गावचे नवनिर्वाचित उपसरपंच सागर गवस यांचा सत्कार…

दोडामार्ग पंचायत समिती उपसभापतींसह मान्यवरांची उपस्थिती.. दोडामार्ग ता. — माटणे गावचे नवनिर्वाचित उपसरपंच श्री सागर गवस यांचा हार व शाल देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. या प्रसंगी दोडामार्ग पंचायत समितीचे उपसभापती श्री गणेशप्रसाद गवस यांनी सागर गवस यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी उपतालुकाप्रमुख श्री बबलू पांगम, युवासेना तालुकाप्रमुख कु. भगवान गवस, मणेरी…

Read Full News

व्यावसायिक एलपीजी वाटपासाठी PNG (Piped Natural Gas) जोडणी आवश्यक…

सिंधुदुर्गातील ग्राहकांना अर्ज करण्याचे आवाहन.. ⚡सिंधुदुर्गनगरी,ता.२७-: केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या प्राप्त निर्देशानुसार, व्यावसायिक एलपीजी (Commercial LPG) वाटपाबाबत सर्व राज्यांच्‍या मुख्य सचिवांना महत्त्वपूर्ण सूचना दिलेल्या आहेत.त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व व्यावसायिक/औद्योगिक (हॉटेल, ढाबे, उपहारगृहे, औद्योगिक कॅन्‍टीन, अन्‍न प्रक्रिया / दुग्‍धव्‍यवसाय, सामुदायिक स्‍वयंपाकघरे इ.) एलपीजी (Commercial ) ग्राहकांना सूचित करण्यात येते की, व्यावसायिक एलपीजीच्या एकूण…

Read Full News

तुटपुंज्या नुकसानभरपाईचा निषेध; बागायतदारांचा सरकारवर तीव्र आक्रोश…

⚡देवगड ता.२७-:कोकणातील बागायतदारांना नुकसानभरपाईपोटी जाहीर केलेली तुटपुंजी रक्कम शासनाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीत वर्ग करून घ्यावी. या तुटपुंज्या मदतीचा कोकणातील शेतकऱ्याला कोणताही फायदा होणार नसून त्या मदतीचा आम्ही जाहीर निषेध करतो. विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांना हेक्टरी ४२ हजाराची, तर विमा न भरणाऱ्या शेतकऱ्यांना २२ हजाराची तुटपुंजी मदत जाहीर करून शासनाने कोकणातील शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने फुसण्याचे काम केले…

Read Full News

नेरूरच्या कै. यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालयाला केएलई च्या उपचार व मदत केंद्रास मंजुरी…

⚡कुडाळ ता.२७-: बेळगाव येथील के एल इ समूहाचे डॉ.प्रभाकर कोरे यांनी नेरुर येथील कै. यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व संशोधन केंद्रामध्ये के. एल.इ. रुग्णालय बेळगाव तर्फे रुग्ण मदत केंद्र, उपचार केंद्र सुरु करण्यासाठी मान्यता दिली आहे.के एल ई रुग्णालय बेळगावचे डॉ.प्रभाकर कोरे यांची बेळगाव येथे बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, नर्सिंग महाविद्यालयाच्या…

Read Full News

नेरूर येथे उद्या मोफत महाआरोग्य शिबिर…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या शुभहस्ते होणार उद्घाटन… ⚡कुडाळ ता.२७-: कै. यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व संशोधन केंद्र,नेरूर येथे बेळगाव येथील के. एल. ई. हॉस्पिटलच्या 142 डॉक्टर- स्टाफ यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आयोजित सर्व रोगावरची तपासणी उपचार यांचा समावेश असलेल्या मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहेत. याचे उदघाटन उद्या २८ मार्च रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश…

Read Full News

You cannot copy content of this page