⚡कुडाळ ता.२७-: बेळगाव येथील के एल इ समूहाचे डॉ.प्रभाकर कोरे यांनी नेरुर येथील कै. यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व संशोधन केंद्रामध्ये के. एल.इ. रुग्णालय बेळगाव तर्फे रुग्ण मदत केंद्र, उपचार केंद्र सुरु करण्यासाठी मान्यता दिली आहे.
के एल ई रुग्णालय बेळगावचे डॉ.प्रभाकर कोरे यांची बेळगाव येथे बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, नर्सिंग महाविद्यालयाच्या प्रा.वैशाली ओटवणेकर,सायलीन वारंग, प्रथमेश हरमाकर यांच्यासहित त्यांची भेट घेऊन कै. यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय येथे आरोग्य सेवा, उपचार याबाबत सहकार्य करण्याची विनंती केली होती. त्या विनंतीस मान देऊन त्यांनी ह्या प्रस्तावास मान्यता दिल्यामुळे भविष्यकाळात नेरुर येथे कै.यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व संशोधन केंद्र येथे बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेच्या पुढाकाराने येथील परिसरातील लोकांना उत्तम आरोग्य विषयक सेवा सुविधा उपलब्ध होणार असल्यामुळे नेरूर, कुडाळ परिसरामध्ये याबद्दल समाधान व्यक्त होत आहे.
नेरूरच्या कै. यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालयाला केएलई च्या उपचार व मदत केंद्रास मंजुरी…
