माटणे गावचे नवनिर्वाचित उपसरपंच सागर गवस यांचा सत्कार…

दोडामार्ग पंचायत समिती उपसभापतींसह मान्यवरांची उपस्थिती..

दोडामार्ग ता. — माटणे गावचे नवनिर्वाचित उपसरपंच श्री सागर गवस यांचा हार व शाल देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. या प्रसंगी दोडामार्ग पंचायत समितीचे उपसभापती श्री गणेशप्रसाद गवस यांनी सागर गवस यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपतालुकाप्रमुख श्री बबलू पांगम, युवासेना तालुकाप्रमुख कु. भगवान गवस, मणेरी विभागप्रमुख श्री रामदास मेस्री तसेच कार्यालयप्रमुख श्री गुरुदास सावंत उपस्थित होते.सत्कार समारंभात उपस्थितांनी सागर गवस यांनी गावाच्या विकासासाठी प्रभावी काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

You cannot copy content of this page