Headlines

Global Maharashtra Breaking News

जिल्ह्यात आज आणखी 230 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१४-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 40 हजार 940 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 3,हजार 309 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 230 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read Full News

नांदगाव येथील पशुवैद्यकिय अधिकारी यांचा सत्कार

*💫कणकवली दि.१४-:* कणकवली तालूक्यातील नांदगाव पशुधन अधिकारी डाॅ.राजेश महादेव कांबळे यांना बढती मिळून नांदगाव येथून कार्यमुक्त होताना नांदगाव येथील किशोर मोरजकर ट्रस्टच्यावतीने यथोचित सत्कार करण्यात आला शाल,श्रीफळ, सन्मानपत्र, पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात आले आहे . मोरजकर ट्रस्टचे अध्यक्ष ऋषिकेश मोरजकर, उपाध्यक्ष भाई मोरये ,भाई मोरजकर , सुदाम मोरये ,अजय गोसावी,अनिल महाडेश्वर आदी ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित हाेते.

Read Full News

केंद्रीयमंत्री पदाचा माध्यमातून सर्वसामान्यांचा विकास साधणार

प्रमोद जठार,अजित गोगटे,अतुल काळसेकर, प्रभाकर सावंत यांनी घेतली नाम.राणेंची भेट कणकवली 14 जुलै (प्रतिनिधी)- सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग विभागाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या अंत्योदय योजनेप्रमाणे छोट्यात छोट्या तळागाळातल्या व्यक्तीला कोकणात रोजगार मिळणार आहे. केंद्रीयमंत्री पदाचा सिंधुदुर्गातील नागरिकांना होण्यासाठी उपाययोजना राबविल्या जाणार असल्याचा विश्वास नाम.नारायण राणे यांनी व्यक्त केला. भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने माजी आमदार,…

Read Full News

रोटरी क्लब कडून भोसले नॉलेज सिटीचे सर्वेसर्वा अच्युत भोसले यांचा वाढदिवस साजरा

*💫सावंतवाडी दि.१४-:* वाढदिवस हे सर्वांचेच साजरे होतात. परंतु, एखाद्या वाढदिवस हा वेगळा असतो. “भोंसले नाॕलेज सिटीचे” सर्वेसर्वा रो.अच्युत सावंत भोसले यांचा वाढदिवस आज मॕनेजमेंट टेक्निक यादृष्टीने साजरा केला गेला. वाढदिवसाच्या निमित्याने रो.अच्युत भोसले यांना उपाध्यक्ष रो.दिलीप म्हापसेकर यांच्या हस्ते बुके देण्यात आला. यावेळी यंदाचे रोटरी क्लब, सावंतवाडीचे “सुवर्ण महोत्सवी वर्ष” शिस्तबद्ध पद्धतीने कसे साजरे करता…

Read Full News

माणगाव खोऱ्यातील आंबेरी पुलावर पाणी;

वाहतूक ठप्प *💫कुडाळ ता.१४-:* गेले दोन ते तीन दिवस सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे माणगाव खोऱ्यातील आंबेरी पुलावर पाणी आले आहे. पुलावर पाणी आल्यामुळे या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे . मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे कर्ली नदीच्या काठावरील आजूबाजूच्या गावांमध्ये सध्या पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील गावांना सतर्कतेचा इशारा दिला जात आहे.

Read Full News

केंद्रीयमंत्री सोडाच,पंतप्रधानपद दिले तरी कोकणात शिवसेना संपवू शकत नाही:ना.उदय सामंत

कणकवलीत शिव संपर्क अभियानाचा शुभारंभ *💫कणकवली दि.१४-:* कोकण शिवसेनेचा बालेकिल्ला आहे,या कोकणात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विशेष प्रेम आहे.त्यामुळे केंद्रीय मंत्री सोडाच,जरी पंतप्रधान दिला तरी कोकणात शिवसेना संपवू शकत नाही,असा टोला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पालकमंत्री उदय सामंत यांनी लगावला आहे. कणकवली येथे शिव संपर्क अभियानाचा शुभारंभ पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आला….

Read Full News

संदेश पारकर यांना मानसन्मान निश्‍चितपणे करणार

ना.उदय सामंत यांची ग्वाही;संदेश पारकर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा *💫कणकवली दि.१४-:* संदेश पारकर हे आक्रमक नेते आहेत. अन्याय होत असेल तर ते कशाचीही तमा न बाळगता रस्त्यावर उतरतात. त्याचा आदर्श प्रत्येक शिवसैनिकांनी घेतला पाहिजे.शिवसेनेत संदेश पारकर यांना पक्षात योग्य तो मान, सन्मान देण्यात येत आहे. त्यामुळे पारकर यांनी आता आहे तिथेच राहावे. भविष्यात त्यांना…

Read Full News

वीज मंडळाने ग्राहकांना टप्याटप्याने देयके भरण्याची मुभा द्यावी

आझाद हिंद शेतकरी संघटनेचे कोकण प्रदेश अध्यक्ष भाई चव्हाण यांची मागणी *💫कणकवली दि.१४-:* कोरोना महामारीमुळे वीज मंडळाची थकबाकी करोडो रुपयांची झाली आहे. ग्राहकांनाही आपली थकबाकी कमी करावी वाटते. म्हणून तो पुर्वीच्या काही महिन्यांचे देयके भरण्यासाठी संबंधित बँका, पतसंस्थाकडे जातो. मात्र कर्मचारी चालू देयकापर्यंतची रक्कम भरणे शक्य नसेल तर वीज मंडळाच्या अधिकाऱ्याकडून शिफारस आणण्याचे सूचवितात. परिणामी…

Read Full News

कुडाळ तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये एसटी बसेस सोडण्यात याव्यात

कुडाळ भाजपच्यावतीने आगारप्रमुख सुजित डोंगरे यांच्याकडे मागणी *💫कुडाळ दि.१४-:* कुडाळ तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांची व विद्यार्थ्यांची शहरातील बाजारपेठ, तहसील कार्यालय बँका आदी ठिकाणी कामानिमित्त येण्याकरिता होणारी गैरसोय टाळण्याकरिता खाजगी वाहनांच्या माध्यमातून आर्थिक भुर्दंड पडू नये याकरिता कुडाळ तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये एसटी बसेस सोडण्यात याव्यात, अशी मागणी भारतीय जनता पार्टी कुडाळच्यावतीने आगारप्रमुख सुजित डोंगरे यांना करण्यात…

Read Full News

जिल्हा बँक अधिकारी-कर्मचाऱ्यांना आर्सेनिक अल्बम गोळ्या वाटप

राष्ट्रवादीचा वेंगुर्लेत उपक्रम वेंगुर्ला प्रतिनिधी- कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यादृष्टीने शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी वेंगुर्ला शहर राष्ट्रवादी काँग्रेसपक्षातर्फे सिंधुदुर्ग जिल्हा बँक वेंगुर्ला शाखेतील सर्व अधिकारी व कर्मचारी यासह त्यांच्या कुटुंबियांना अर्सेनिक अल्बम-३० गोळ्यांचे वितरण राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश महीला सचिव नम्रता कुबल यांनी शाखाधिकारी श्यामुसुंदर मेस्त्री यांचेकडे केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष सत्यवान साटेलकर,…

Read Full News

You cannot copy content of this page