वीज मंडळाने ग्राहकांना टप्याटप्याने देयके भरण्याची मुभा द्यावी

आझाद हिंद शेतकरी संघटनेचे कोकण प्रदेश अध्यक्ष भाई चव्हाण यांची मागणी

*💫कणकवली दि.१४-:* कोरोना महामारीमुळे वीज मंडळाची थकबाकी करोडो रुपयांची झाली आहे. ग्राहकांनाही आपली थकबाकी कमी करावी वाटते. म्हणून तो पुर्वीच्या काही महिन्यांचे देयके भरण्यासाठी संबंधित बँका, पतसंस्थाकडे जातो. मात्र कर्मचारी चालू देयकापर्यंतची रक्कम भरणे शक्य नसेल तर वीज मंडळाच्या अधिकाऱ्याकडून शिफारस आणण्याचे सूचवितात. परिणामी बहुतांश ग्राहक देयक न भरताच परततात. तरी मंडळाने विद्यमान परिस्थितीत टप्पा देयके स्विकारावी, अशी मागणी आझाद हिंद शेतकरी संघटनेचे कोकण प्रदेश अध्यक्ष भाई गणपत चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. कोरोना महामारीमुळे शासकीय-निमशासकीय कर्मचारी वगळता बहुसंख्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली आहे. तरीही वीज ग्राहक मुलांच्या ऑनलाईन शिक्षणात व्यत्यय येऊ नये या भितीपोटी पोटाला चिमटा काढून निदान मागील काही महिन्यांची देयके भरण्यासाठी वीज मंडळाने नियुक्त केलेल्या वित्तीय संस्थांमध्ये जातो. त्यावेळी कर्मचारी संगणक दाखवित असलेल्या चालू देयकापर्यंतची रक्कम भरावी लागेल. शक्य नसेल तर अधिकाऱ्याकडून तशी शिफारस घेऊन या असे सूचवितात, अशी माहिती देऊन चव्हाण म्हणाले, त्यामुळे बहुतांश ग्राहक अनेक कारणांमुळे देयके न भरतात मागे परतात. त्यामुळे मंडळाची वसूली न होता थकबाकी करोडो रुपयांनी वाढत जाते. विद्यमान परिस्थितीत वीज मंडळाने देयके पुर्ण वसूलीची दंडेलशाही करु नये. ग्राहकांना टप्याटप्याने देयके भरण्याची मुभा द्यायला हवी, अशी मागणी चव्हाण यांनी या पत्रकातून केली.

You cannot copy content of this page