कुडाळ भाजपच्यावतीने आगारप्रमुख सुजित डोंगरे यांच्याकडे मागणी
*💫कुडाळ दि.१४-:* कुडाळ तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांची व विद्यार्थ्यांची शहरातील बाजारपेठ, तहसील कार्यालय बँका आदी ठिकाणी कामानिमित्त येण्याकरिता होणारी गैरसोय टाळण्याकरिता खाजगी वाहनांच्या माध्यमातून आर्थिक भुर्दंड पडू नये याकरिता कुडाळ तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये एसटी बसेस सोडण्यात याव्यात, अशी मागणी भारतीय जनता पार्टी कुडाळच्यावतीने आगारप्रमुख सुजित डोंगरे यांना करण्यात आली. कुडाळ भाजपच्यावतीने आगारप्रमुख सुजित डोंगरे यांची भेट घेत चर्चा करण्यात आली. या चर्चेमध्ये भाजपाचे निलेश तेंडुलकर, युवा नेते आनंद शिरवलकर, जिल्हा चिटणीस बंड्या सावंत, शहराध्यक्ष राकेश कांदे सहभागी झाले होते. यावेळी कुडाळ बसस्थानक येथील प्रवासी शेड आणि बैठक व्यवस्था संदर्भात शहराध्यक्ष राकेश कांदे यांनी लक्ष वेधले. यावेळी तालुका उपाध्यक्ष देवेंद्र नाईक, शक्ती केंद्रप्रमुख राजू बक्षी, जनार्दन कुडाळकर आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
