राष्ट्रवादीचा वेंगुर्लेत उपक्रम
वेंगुर्ला प्रतिनिधी- कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यादृष्टीने शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी वेंगुर्ला शहर राष्ट्रवादी काँग्रेसपक्षातर्फे सिंधुदुर्ग जिल्हा बँक वेंगुर्ला शाखेतील सर्व अधिकारी व कर्मचारी यासह त्यांच्या कुटुंबियांना अर्सेनिक अल्बम-३० गोळ्यांचे वितरण राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश महीला सचिव नम्रता कुबल यांनी शाखाधिकारी श्यामुसुंदर मेस्त्री यांचेकडे केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष सत्यवान साटेलकर, जिल्हा बँकेची माजी संचालक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सदस्य नितीन कुबल, बँकेचे अधिकारी भाग्येश बागायतकर, श्री.आजगांवकर, श्री.वेंगुर्लेकर, जयराम गावडे, सरताज शेख, मयुरी बेहेरे, प्रतिक्षा बोवलेकर, श्रीमती गावडे, श्री.कोरगांवकर, राजू चिचकर आदी उपस्थित होते. फोटोओळी – राष्ट्रवादीतर्फे जिल्हा बँक वेंगुर्ला शाखेत अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वितरण केले.
