यशवंत परब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न
*💫वेंगुर्ला दि.१४-:* वेंगुर्ला तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या एकूण ८२ प्रकरणांना मंजूरी देण्यात आली.निराधार अनुदान योजना समितीची त्रैमासिक बैठक यशवंत परब यांच्या अध्यक्षतेखाली १३ जुलै रोजी वेंगुर्ला तहसिलदार येथे संपन्न झाली. यावेळी तहसिलदार प्रविण लोकरे, विश्वनाथ परब, सुकन्या नरसुले, तुकाराम परब, मनोहर येरम, सुरेश भोसले, मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे, गटविकास अधिकारी यांचे प्रतिनिधी एस.बी.चव्हाण, निलेश मयेकर उपस्थित होते. या सभेत संजय गांधी अनुदान योजनेची २६, श्रावणबाळ सेवा राज्य योजनेची ७, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळा योजनेची ८ प्रकरणे मंजूर करण्यात आली. सन २००५ नंतर कोणत्याही शासन सर्वेक्षणाने दारिद्रयरेषेची निश्चित धोरणे व यादी तयार झालेली नसल्याने राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य देताना कुटुंब दारिद्रय रेषेखाली असल्याचे लेखी पुरावे मागणी ही अट शिथील करण्यात यावी. अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यासाठी संजय गांधी समितीच्या सदस्यांनी वेंगुर्ला तहसिलदार यांच्याकडे सुपुर्द केले.
