*💫सावंतवाडी दि.१४-:* येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालय मध्ये आज श्री. पंचम खेमराज महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष राजेसाहेब श्रीमंत शिवरामराजे भोसले यांची २६ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली आहे. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेसाहेब खेमसावंत भोंसले यांनी राजसाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. या प्रसंगी संस्थेच्या कार्याध्यक्षा राणीसाहेब श्रीमंत शुभदादेवी भोंसले, कार्यकारी विश्वस्थ युवराज लखमराजे भोंसले, सौ श्रद्धाराजे भोंसले, संस्थेचे संचालक प्रा डी टी देसाई, सदस्य जयप्रकाश सावंत, डॉ सतीश सावंत, ॲड श्यामराव सावंत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी एल भारमल, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते श्री पंचम खेमराज महाविद्यालय संस्थापक अध्यक्ष राजेसाहेब श्रीमंत शिवरामराजे भोंसले यांनी 1961 मध्ये श्री पंचम खेमराज महाविद्यालयाची स्थापना करत उच्चशिक्षणाची दारे सर्वसामान्यांसाठी खुली केली. त्यामुळे या भागातील गरीब शेतकऱ्यांची मुले येथे उच्च शिक्षण घेऊ शकली. त्यांनी आपले पूज्य पिताश्री पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज यांचे शैक्षणिक स्मारक म्हणून या महाविद्यालयाची निर्मिती केली. आज हे महाविद्यालय जिल्ह्यातील एक अग्रगण्य महाविद्यालय म्हणून लौकिक प्राप्त करून आहे राजेसाहेबांच्या स्मृतींना यावेळी वंदन करण्यात आले.
पंचम खेमराजमध्ये श्रीमंत शिवरामराजे भोसले यांची पुण्यतिथी साजरी
