उभ्या असलेल्या टेम्पोला मोटरसायकलची धडक; अपघातात युवक जागीच ठार

जानवलीत हायवे उड्डाणपुलावर झाला अपघात

*💫कणकवली दि.१४-:* मुंबई गोवा महामार्गवरील कणकवली नजीकच्या जाणवली येथे हायवेच्या उड्डाणपुलावर उभ्या असलेल्या ट्रकला मोटरसायकलने मागून दिलेल्या धडकेत मोटरसायकलस्वार जागीच ठार झाला आहे. रवींद्र रमेश यादव ( वय 37, मूळ रा. कट्टा बाजारपेठ, ता. मालवण ) असे मृत युवकाचे नाव असून तो जाणवलीहून कणकवलीच्या दिशेने येत होता. कणकवलीनजीकच्या जाणवली येथील सापळे शो रूम समोर जाणवली उड्डाणपुलावर आज सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. मयत रवींद्र यादव हा कणकवलीत खाजगी वाहनांवर चालक म्हणून काम करतो. ब्रेक डाऊन झालेला आयशर टेम्पो नॅशनल हायवेवर जाणवली उड्डाणपुलावर उभा होता. त्या टेम्पोला मोटारसायकलवरून येणाऱ्या रवींद्र याने मागून ठोकर दिली. या अपघातात रविंद्रचा जागीच मृत्यू झाला. अपघाताचे वृत्त समजताच महिला पोलीस उपनिरीक्षक धनश्री पाटील, हवालदार रवींद्र बाईत, कॉन्स्टेबल रुपेश गुरव, वैभव कोळी घटनास्थळी पोचले. मयत रवींद्रचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला.

You cannot copy content of this page