प्रमोद जठार,अजित गोगटे,अतुल काळसेकर, प्रभाकर सावंत यांनी घेतली नाम.राणेंची भेट
कणकवली 14 जुलै (प्रतिनिधी)- सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग विभागाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या अंत्योदय योजनेप्रमाणे छोट्यात छोट्या तळागाळातल्या व्यक्तीला कोकणात रोजगार मिळणार आहे. केंद्रीयमंत्री पदाचा सिंधुदुर्गातील नागरिकांना होण्यासाठी उपाययोजना राबविल्या जाणार असल्याचा विश्वास नाम.नारायण राणे यांनी व्यक्त केला. भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने माजी आमदार, प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची दिल्लीत भेट घेतली.यावेळी माजी आमदार अजित गोगटे,बँक संचालक अतुल काळसेकर, सरचिटणीस प्रभाकर सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाने कोकणच्या नेत्याला योग्य सन्मान दिल्याने कोकणात आनंद आहे,आपण लवकरच रत्नागिरी सिंधुदुर्ग दौऱ्यावर या कार्यकर्ते आपल्या आगमनाची वाट पाहत असल्याचे शिष्टमंडळाच्या वतीने प्रमोद जठार यांनी ना.राणेंना सांगितले.तसेच खऱ्या अर्थाने आता कोकणात बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी संधी आहे.आता नियोजन करुन विविध प्रकल्प आणावेत,अशी विनंती माजी आमदार प्रमोद जठार यांनी केली.त्यावर ना.राणे यांनी सकारात्मक चर्चा केली आहे.
