Headlines

Global Maharashtra Breaking News

शिरोडा येथील सलून व्यावसायिकाने दाखविले सामाजिक भान

वाढदिवसानिमित्ताने केले मास्क वाटप *💫वेंगुर्ले दि.२०-:* कोरोणा विषाणूच्या महामारी मध्ये ग्रामस्थांच्या सुरक्षतेसाठी शिरोडा येथील सलून व्यावसायिकाने वाढदिवसाच्या निमित्त मास्क वाटप केले. गेल्या वर्षापासून कोरोना विषाणू चे संपूर्ण जगावर सावट असून कोरोना पासून बचाव करण्यासाठी विविध उपाय योजना आखल्या जातात याला अनुसरून शिरोडा येथील सलुन व्यवसायिक तथा सामाजिक कार्यकर्ते सुरेश अनंत रेडकर वय वर्ष ६५ यांनी…

Read Full News

आर्थिक मदत करा

दशावतारी कलाकारांची जिल्हा प्रशासनाजवळ मागणी *💫ओरोस दि.२०-:* कोरोना लॉकडाऊनमुळे सिंधूदुर्ग जिल्ह्यातील पारंपरिक दशावतार नाट्यप्रयोग थांबले आहे. यामुळे जिल्ह्यातील असंख्य कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने या कलाकारावर आलेली बेरोजगारी दूर करून उदरनिर्वाहसाठी आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी सिंधूदुर्ग जिल्हा पारंपरिक दशावतार कलाकार बहुउद्देशीय संघाने लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांच्याकडे केली आहे. यावेळी बाळू कोचरेकर,…

Read Full News

कणकवली येथे १ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय लोकअदालत

आपली प्रकरणे सामोपचाराने सोडवा:न्या.सलीम जमादार *💫कणकवली दि.२०-:* कणकवली दिवाणी न्यायालय व तालुका असोशिएशन कणकवली यांच्यावतीने १ ऑगस्ट २०२१ रोजी दिवाणी न्यायालय कणकवली येथे सकाळी १०.३० वाजता ‘ राष्ट्रीय लोक अदालत’ चे आयोजन करणेत आलेले आहे . हे लोकअदालत पक्षकारांच्या हितासाठी असून त्यातून त्यांना कमीत कमी खर्चात प्रभावी न्याय मिळू शकतो . ज्या पक्षकारांची प्रलबित असलेली…

Read Full News

प्रा.महेंद्र नाटेकर यांच्या कार्याचा गुणगौरव करावा तेवढा थोडाच :प्रा .पी.बी.पाटील

*💫कणकवली दि.२०-:* प्रतिकूल परिस्थितीमध्ये प्रा . महेंद्र नाटेकर यांनी शैक्षणिक , सामाजिक व राजकीय केलेले कार्यप्रेरणादायी व थक्क करुन टाकणारे आहे . त्यांच्या ह्या विधायक कार्याबद्दल त्यांचा गुणगौरव करावा तेवढा थोडाच आहे . असे अध्यक्ष पदावरुन बोलताना प्राचार्य डॉ . पी.बी. पाटील म्हणाले . प्रा , महेंद्र नाटेकर यांच्या ८३ व्या वाढदिवसानिमित्त पेन्शनर्स संघटनेने पेन्शनर्स…

Read Full News

नांदगावात आषाढी एकादशीचा उत्सव साजरा

*💫कणकवली दि.२०-:* -कणकवली तालुक्यातील नांदगाव वाघाचीवाडी येथील विठ्ठल मंदिर येथे आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वीच नदीचे पाणी या विठ्ठल मंदिराभोवती मोठ्या प्रमाणात आले होते. मात्र काल सायंकाळपासून पावसाने थोडीशी उसंत घेतली आहे. त्यामुळे येथील पाणी कमी झाले आहे. विठ्ठल रखुमाईची सकाळी विधीवत पूजा करण्यात आली. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्ष…

Read Full News

ठाकरे सरकारच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याला सुगीचे दिवस…

अपूर्ण पाटबंधारे प्रकल्पांसाठी ५०५.०५ कोटी रुपयांची तरतूद;खासदार विनायक राऊत यांच्या मागणीला यश *💫कुडाळ दि.२०-:* ठाकरे सरकारच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याला लवकरच सुगीचे दिवस दिवस येणार असून खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केलेल्या मागणीचा विचार करता अपूर्ण पाटबंधारे प्रकल्पांना ५०५.०५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे खासदार विनायक राऊत यांच्या मागणीला अखेर यश…

Read Full News

कोरोना व्हायरसमुळे उध्वस्त झालेल्या पर्यटन व्यावसायिकांना भरीव आर्थिक मदत करावी

पर्यटन व्यावसायिक महासंघ अध्यक्ष बाबा मोंडकर यांची मागणी *💫मालवण दि.२०-:* कोरोना व्हायरसमुळे उध्वस्त झालेल्या पर्यटन व्यावसायिकांना असलेली शासनाच्या भरीव आर्थिक मदतीची व पॉलिसीची गरज ओळखून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघ अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी निवेदनातून केली आहे. निवेदनात मोंडकर यांनी म्हटले की, गेल्या दीड वर्षात कोरोना…

Read Full News

जिल्ह्यातील 20 लघु पाटबंधारे प्रकल्प फुल्ल

सिंधुदुर्गनगरी, दि. 20 (जि.मा.का.) – जिल्ह्यातील 20 लघु पाटबंधारे प्रकल्प 100 टक्के भरले आहेत. तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामधून एकूण 3 हजार 948 क्युसेक्स विसर्ग सुरू असून सध्या या प्रकल्पामध्ये 366.3650 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 81.89 टक्के भरले आहे. या धरणाच्या पालणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात 22.60 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे…

Read Full News

कणकवली, देवगड तालुक्यात सर्वाधिक 87 मि.मी. पाऊस

*💫सिंधुदुर्गनगरी दि.२०-:* जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कणकवली आणि देवगड तालुक्यात सर्वाधिक 87 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 57 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2317.888 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 40(2185),…

Read Full News

वेंगुर्ला तालुका कॉग्रेस पक्षाची विशेष सभा जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांच्या उपस्थितीत संपन्न  

पुढील काळातील निवडणूका स्‍वबळावर लढविण्‍याचा घेण्यात आला एकमुखी ठराव *💫वेंगुर्ला दि.१९-:* पुढील काळातील सर्व प्रकारच्‍या निवडणूका स्‍वबळावर लढविण्‍याची पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तयारी ठेवावी. आणि आत्तापासून कामाला लागावे, असा एकमुखी ठराव आज झालेल्या वेंगुर्ला तालुका कॉग्रेस पक्षाच्‍या विशेष सभेत घेण्‍यात आला. स्‍वामिनी मंगल कार्यालय वेंगुर्ला येथे, सिंधुदुर्ग जिल्‍हा काँग्रेसचे अध्‍यक्ष बाळा गावडे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली वेंगुर्ला तालुका…

Read Full News

You cannot copy content of this page