Headlines

Global Maharashtra Breaking News

कळणे खनिज मायनिंग प्रकल्पामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी

मनसे राज्य सरचिटणीस परशुराम उपरकर यांची जिल्हाधिकाऱ्यांच्याजवळ मागणी *⚡ओरोस ता.२१-:* कळणे खनिज मायनिंग प्रकल्पामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना घर, जमीन, शेती, फळझाडे यांची झालेली नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी, अशी मागणी माजी आमदार तथा मनसे राज्य सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याजवळ निवेदनातून केली आहे. निवेदनात उपरकर यांनी म्हटले की, दोडामार्ग कळणे खाण प्रकल्पातील अतिवृष्टीमुळे अनेकदा…

Read More

लिंग माऊली वि. सह.सेवासोसायटी लि.ओसरगाव या संस्थेचे भूमिपूजन

जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत व आम. वैभव नाईक यांची उपस्थिती *⚡कणकवली ता.२१-:* लिंग माऊली विकास सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड ओसरगाव या संस्थेचे भूमिपूजन जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत व आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते संपन्न झाले. जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत आमदार वैभव नाईक यांचा लिंग माऊली सहकार सेवा सोसायटीच्या वतीने शाल व श्रीफळ…

Read More

कौस्तुभ कदम यांना युवा कला गौरव सन्मान पुरस्कार जाहीर

*⚡मालवण ता.२१-:* आर्टस् बिट्स फाउंडेशन, पुणे या संस्थेतर्फे दिला जाणारा युवा कला गौरव सन्मान पुरस्कार मूळ मालवण खैदा कातवड येथील व सध्या मुंबई ठाणे येथे राहत असलेले फोटोग्राफी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कौस्तुभ कमलाकर कदम यांना जाहीर झाला आहे. कौस्तुभ कदम यांना बालपणापासून फोटोग्राफीची आवड होती.हीच आवड त्यांना युवा कला गौरव सन्मानासपात्र ठरवून गेली. गेली…

Read More

विनापरवाना लाकूड वाहतुकीवर वनविभागाची कारवाई

फोडा येथे लाकडाने भरलेला ट्रकसह 7 लाख 65 हजार चा मुद्देमाल जप्त *⚡कणकवली ता.२१-:* फोंडा दाजीपूर रस्तावर आकेशीय जातीचे अवैध लाकूड वाहतूक करत असताना फोंडा येथे ट्रक व लाकूड असा तब्बल 7 लाख 65 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी प्रशांत नामदेव राणे रा.भैरिबांबर ता राधानगरी व अमर बळवंत शिंदे रा.ठिपकुर्ली ता….

Read More

कोविडमुळे पालक गमावलेल्या बालकांच्या पालकांना महिला व बाल विकास कार्यालयातर्फे मार्गदर्शन

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.२१-:* कोविड 19 मुळे एक पालक व दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या पालकांना महिला व बाल विकास कार्यालयातर्फे बाल संगोपन योजना तसेच कोविडच्या अनुषंगाने पूर्ण अनाथ झालेल्या कुटुंबांना आर्थिक लाभाबाबात समुपदेशन व मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विश्वनाथ कांबळे, जिल्हा परिविक्षा अधिकारी भिकाजी काटकर,…

Read More

चला पितृपक्ष साजरा करूया नव्या पद्धतीने असलदे येथील दिविजा वृध्दाश्रमाने केले आवाहन

*⚡कणकवली ता.२१-:*  पितृपक्षात आपल्या पूर्वजांच्या प्रित्यर्थ विविध विधी केले जातात. हे विधी करण्यासाठी अनेकजण प्रचंड पैसे खर्च करतात. त्याएवजी असलदे येथील दिविजा वृध्दाश्रमातील वृध्दांना आपल्या पितृजनांची आठवण म्हणून मदत करुन पितृपक्ष वेगळ्या पध्दतीने साजरे करण्याचे आवाहन असलदे येथील दिविजा वृध्दाश्रमाच्या व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे.  गणेशोत्सव झाला की पितृपक्षातील सर्व विधी आटोपून मुंबईस्थित चाकरमानी परतीच्या प्रवासाला…

Read More

अन्यथा कणकवलीतील मटन चिकन दुकाने होणार सील

मुख्याधिकार्‍यांनी दिला इशारा;नियमांचे पालन करण्याच्या सूचना *⚡कणकवली ता.२१-:* कणकवली शहरातील मटन व चिकन विक्रेत्यांना नगरपंचायत कडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मटन व चिकन विक्रेत्यांकडून स्वच्छतेचे पालन करण्याच्या अनुषंगाने या नोटिसा देण्यात आल्या असून नियमानुसार पालन न केल्यास सदर व्यवसाय सील करण्याचा इशारा कणकवली मुख्याधिकार्‍यांनी या कणकवली शहरातील चिकन मटन व्यवसायिकांना दिला आहे . कणकवली शहरातील…

Read More

वरवडे येथील रहिवासी इंदुमती सदानंद कांबळी यांचे निधन

*⚡कणकवली ता.२१-:* कणकवली तालुक्यातील वरवडे येथील रहिवासी इंदुमती सदानंद कांबळी (९४ )यांचे सोमवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुलगे, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा चिरेखाण मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष व वरवडेचे माजी ग्रा. प. सदस्य प्रमोद कांबळी व माजी ग्रा.पं सदस्य प्रकाश कांबळी यांच्या त्या मातोश्री होत.

Read More

त्या दोन्ही संशयितांना ताब्यात घ्या

बँक कर्मचारी सुसाईट नोट प्रकरण;सोनूर्ली, कारीवडेतील महिला आक्रमक *⚡सावंतवाडी ता.२१-:* एका खाजगी बँकेतील कर्मचारी मनोहर गावडे सुसाईड नोट लिहून बेपत्ता असून, त्याचा शोध लावण्यास पोलिसांना अद्याप पर्यंत यश आले नसल्याने सोनुर्ली आणि कारिवडे येथील महिला आक्रमक झाल्या असून, त्यानी आज थेट सावंतवाडी पोलिस स्थानकात धडक देत घेराव घालत जाब विचारला आहे. यावेळी त्यांनी सुसाईड नोट…

Read More

तिलारीतील प्रस्तावित इम्युटमेंट पार्क प्रकल्पाच्या हालचालींना वेग

सिसट्युला ट्युलिप सीईओ माईक बेरी यांनी केली पाहणी;आ केसरकर यांची उपस्थिती *⚡दोडामार्ग ता.२१ सुमित दळवी-:* तिराळी धरण क्षेत्रातील इम्युटमेंट पार्क प्रकल्पाला मूर्त स्वरूप येण्याची चिन्हे दिसू लागली असून आज आमदार दिपक केसरकर यांसह आंतराष्ट्रीय ख्यातीचे पुरस्कार परीक्षक तथा समीक्षक व या प्रकल्पाचे काम करण्यास इच्छुक असलेल्या सिसट्युला ट्युलिप या संस्थेचे सी ई ओ माईक बेरी…

Read More
You cannot copy content of this page