अन्यथा कणकवलीतील मटन चिकन दुकाने होणार सील

मुख्याधिकार्‍यांनी दिला इशारा;नियमांचे पालन करण्याच्या सूचना

*⚡कणकवली ता.२१-:* कणकवली शहरातील मटन व चिकन विक्रेत्यांना नगरपंचायत कडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मटन व चिकन विक्रेत्यांकडून स्वच्छतेचे पालन करण्याच्या अनुषंगाने या नोटिसा देण्यात आल्या असून नियमानुसार पालन न केल्यास सदर व्यवसाय सील करण्याचा इशारा कणकवली मुख्याधिकार्‍यांनी या कणकवली शहरातील चिकन मटन व्यवसायिकांना दिला आहे . कणकवली शहरातील मटन चिकन व्यावसायिकांना सोमवारपासून या नोटिसा बजावण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी स्वच्छता बाळगावी ,व्यवसायिकांनी त्यांच्याकडे गोळा होणारा कचरा वर्गीकरण करूनच मटन चिकन विक्री करावी. त्यांनी कोणत्याही प्रकारच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू नये तसेच या विक्रेत्यांनी सांडपाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था करावी. नगरपालिका अधिनियम 270 अ प्रमाणे दगडी फरशी किंवा इतर फरशी दुकानाच्या परिसरात वापरण्यात यावी .याचा अवलंब न केल्यास सदर व्यवसाय सील करण्यात येईल असा इशारा मुख्याधिकारी अवधुत तावडे यांनी दिला आहे

You cannot copy content of this page